मुंबई- बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसात लग्नाची धामधूम उडाली होती. रिलेशनशीपमध्ये असलेल्या अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या. यामध्ये सगळयात चर्चेचं लग्नं ठरलं ते म्हणजे बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आघाडीची नायिका आलिया भट्ट यांचं. १४ जूनला या दोघांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. पाच वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडीचं लग्नं कधी होणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतच.

VIDEO: मंदाना करिमीने बुरखा घालून केला डान्स, नंतर जे झालं ते इथे वाचा

अगदी मोजक्या निमंत्रितांच्या साक्षीने रणबीर आणि आलियाचं लग्नं झालं. या लग्नाचे फोटो, व्हिडिओ खूप व्हायरल झाले ज्यामध्ये नीतू कपूर यांनी खूप धमाल केल्याचं दिसलं. पण आता मुलाच्या लग्नानंतर दोन महिन्यात नीतू कपूर यांनी आलियाविषयी मनातील एक गोष्ट ओठावर आणली आहे. अखेर सासू नीतू कपूर आलियाविषयी काय बोलल्या ते बघा.


नीतू कपूर या रणबीर आणि आलियाच्या लग्नात खूपच खुश होत्या. लग्नातील प्रत्येक विधीत त्यांनी खूप धमाल केली. मेहंदी, हळदी, लग्न या प्रत्येक सोहळ्यातील नीतू कपूर यांचा लुकही व्हायरल झाला. या लग्नाने एक संदेश दिला की लग्नातील डामडौलपेक्षा आनंद किती महत्वाचा आहे. तुम्ही तिथेच लग्न करा जिथे तुमचा आनंद आहे. रणबीर- आलियाच्या लग्नाने हेच दाखवून दिलं असंही नीतू म्हणाल्या.

शमशेराचं पोस्टर लीक, रणबीरचा लूक पाहून थक्क झाले चाहते

रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर खूप गोष्टी बदलल्या असं वक्तव्य त्यांनी नुकतच एका मुलाखतीत केलं. त्या म्हणाल्या, आलिया आमच्या घरी सून म्हणून आल्यापासून रणबीरच काय तर मलाही तिचं म्हणणं ऐकावं लागतं. लग्नानंतर रणबीर इतका बदलला आहे की त्याला आलियाच जबाबदार आहे.


आता तुम्ही म्हणाल की आलिया असं काय वागली की त्यामुळे रणबीर बदलला असं नीतू कपूर यांना वाटतय. पण तसं नाहीय, आलियाने रणबीरमध्ये चांगला बदल केल्यामुळे सासू म्हणून नीतू यांनी सूनबाई आलियाला शाब्बासकी दिलीय. त्या म्हणाल्या की, आलिया खूप पॉझिटिव्ह आहे. ती घरात असते तेव्हा नेहमी हसतमुख असते. पूर्वी मला रणबीरची काळजी असायची पण आता आलियाने त्याला इतकं आनंदी ठेवलं आहे की मला त्याची काळजी वाटत नाही. यापूर्वी तो कसाही राहायचा आता मात्र आलियाने त्याला शिस्त लावली आहे. एक आई म्हणून मला दुसरं काय हवं. रणबीरमध्ये दोन महिन्यात जो काही चांगला बदल झालाय त्याचे क्रेडिट आलियालाच आहे.


सध्या त्या जुग जुग जिओ या त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. २४ जून रोजी त्यांचा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून नीतू कपूर या कमबॅक करत आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांच्या आयुष्यात एक पोकळी आली होती. त्यात रणबीर आणि आलिया यांच्या लग्नावरून होणाऱ्या चर्चेनंही त्यांना टेन्शन यायचं. पण आता सगळं काही ठिक झाल्याने नीतूदेखील खुश आहेत.

‘चला हवा येऊ दया साठी ‘कियारा-वरुणचा मेट्रो प्रवास

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.