मुंबई: ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींची नाव घ्यायचं म्हटलं तर अभिनेत्री काजोलचे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बाजीगर’, ‘गुप्त’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’, ‘फना’ हे काजोलचे काही सुपरहिट चित्रपट. या सिनेमांमधील काजोलच्या भूमिकांचं आजही कौतुक होतं. दरम्यान अभिनेत्री काजोल आज ४८ वर्षांची झाली आहे. ०५ ऑगस्ट रोजी अभिनेत्री तिचा वाढदिवस (Happy Birthday Kajol) साजरा करतेय.

शिल्पाचे फोन उचलायचा नाही दीपेश भान, शेवटपर्यंत राहिला अबोला

एकेकाळी काजोलच्या प्रेमात हजारो चाहते होते. पण काजोल सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या प्रेमात पडली आणि तिने त्यात्याशी लग्नगाठ बांधली. अजय आणि काजोलचे लव्ह मॅरेज होते. पण तुम्हाला माहितेय का अजय हे काजोलचे पहिले प्रेम नाही आहे. काजलला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अजय नव्हे दुसराच एक अभिनेता आवडत असे. अभिनेत्रीचा सर्वात जवळचा मित्र आणि बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने याबाबत गौप्यस्फोट केला होता. कपिल शर्माच्या शोमध्ये त्याने याबाबत भाष्य केले होते.


कोण होता अभिनेत्रीचा क्रश?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, द कपिल शर्मा शो या कार्यक्रमादरम्यान करण जोहरने याबाबत खुलासा केला होता. करण जोहरने सांगितले होते की, हिना चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये अभिनेत्री काजोल तिचा ‘क्रश’ अक्षय कुमारला शोधत होती. ऋषी कपूर आणि झेबा बख्तियार यांच्या हिना या चित्रपटाचा प्रीमियर होता. जिथे अक्षय कुमारच्या आगमनाची चर्चा होती. यादरम्यान तिला अक्षय कुमारला तर भेटला नाही, पण त्यांच्यातील मैत्री पक्की झाली होती.

कसं आहे आमिर खानचं रिना आणि किरणबरोबरचं नातं, उलगडली गुपितं

पहिल्या भेटीत आवडला नव्हता अजय

या चॅट शोमध्ये करणने आणखी एक गौप्यस्फोट केला होता. त्याच्या मते पहिल्या भेटीत काजोलला अजय देवगणही आवडत नव्हता. काजोलनेही करणच्या या वक्तव्याला होकार दिला होता. नंतर एका चित्रपटासाठी काम करताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. एकत्र काम करत असताना दोन्ही स्टार्समध्ये घट्ट मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे दोघांनी लग्न केले. आता काजोल आणि अजय बॉलिवूडच्या आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.


अभिनय क्षेत्रात पूर्ण झाली ३० वर्ष

अभिनेत्री काजोल गेली ३० वर्ष अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिला जुलै २०२२ मध्ये या क्षेत्रात तीन दशकं पूर्ण झाली. काजोलने १९९२ साली बेखूदी सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यावेळी ती अवघ्या १७ वर्षांची होती.

‘संजय माझ्याकडे नटरंगसाठी आलेला पण…

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.