गडचिरोली : अतिवृष्टीने राज्यातील १० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात २५ हजार हेक्टर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. येथील नागरिकांचा संसार खरिपाच्या धानावर अवलंबून आहे. मात्र पीक गेल्याने मोलमजुरी करणाऱ्यांनी जगायचे कसे? असा सवालही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. त्यामुळे एसडीआरएफचे नॉर्मस बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुसळधार पावसाने १२ नागरिकांनी जीव गमावला

मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पुलावर मोठ्याप्रमाणात पाणी वाहिले. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे १२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. घरातील कर्ता पुरूष गेल्याने संसार कोलमडून पडला. त्यामुळे अशा आधार गमवलेल्या कुटुंबांना सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

‘घराच्या भींतीला ओलावा आला, त्याचाही पंचनामा करा’

मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे एसडीआरएफचे नॉर्मस बाजूला ठेऊन प्रशासनाने नागरिकांना मदत करायला हवी. १२ नागरिकांचा या पावसाने बळी घेतला आहे. त्यासह शेतकऱ्यांच्या अनेक जनावरांनी आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी, असेही अजित पवार म्हणाले. अनेक नागरिकांची घरे कोलमडून पडली आहेत. त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे त्यांना सरकारने मदत करायला हवी. इतकेच नाही तर ज्या घरांच्या भींतीला ओलावा आला त्याचाही पंचनामा करण्याची मागणी अजित पवार यांनी गडचिरोलीत केली.

‘खरीप गेला आता रब्बीचे पीक घेता येणार नाही’

पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातही खरीप पिकावर विदर्भातील शेतकऱ्यांचा संसार अवलंबून आहे. विशेषता धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचा खरीप हंगाम गेलाच आहे, आता रबीची पिकेही येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा संसारच कोलमडल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोली पुरात उद्ध्वस्त! शेकडो संसार उघड्यावर, चार हजार घरांसह ६०० कोटींचे नुकसान

पुलावरून वाहिले २८ लाख क्युसेक पाणी

मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस झाल्याने विदर्भात पुलावरून २८ लाख क्युसेकने पाणी वाहत असल्याचेही अजित पवार म्हणाले.

गडचिरोलीत हाहाकार;तेलंगणमधील मेडीगट्टा-कालेश्वरचे पाणी सोडल्याने १२Source link

Leave a Reply

Your email address will not be published.