मुंबई- अभिनेत्री दिव्या भारतीने या जगाचा निरोप घेऊन ३० वर्षे उलटून गेली. १९९० साली दिव्या भारतीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि १९९३ च्या मार्चमध्ये तिचा गूढ मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली की अपघात झाला की तो घातपात होता हे कोडं आज ३० वर्षांनंतरही गुलदस्त्यातच आहे. तिच्या मृत्यूचं सत्य अजूनही बाहेर आलेलं नसलं तरी तिच्या फिल्मी कारकीर्दीतील एक हिट सिनेमा तिच्यापासून हिरावून घेतला गेला हा तिच्या आईने अभिनेता आमीर खान याच्यावर केलेला आरोप मात्र उघड झाला आहे. आमिरमुळेच माझ्या मुलीच्या हातून एक चांगला सिनेमा निसटला असं विधान दिव्या भारतीच्या आईने केला होतं. आता हा आरोप करण्यामागील नेमकं काय कारण होतं याची उत्सुकता आहे.

नटरंगमध्ये काम मिळावं म्हणून चक्क संजय नार्वेकर गेलेला दिग्दर्शकाकडे


वयाच्या १६ व्या वर्षी दिव्या भारती तेलगू सिनेमातील हिट अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये आली. ‘विश्वात्मा’ या पहिल्याच सिनेमात तिने बाजी मारली. दिवाना या सिनेमात ती ऋषी कपूर आणि शाहरूख खान यांच्यासोबत पडद्यावर दिसली. दिल का क्या कसूर सिनेमातील तिचा अंदाजही प्रेक्षकांना आवडला. मात्र साजिद नाडियादवालाशी लग्न करून काही दिवसातच तिचा मृत्यू झाला. तिचे चाहते अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.


अवघ्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत दिव्या भारतीने यश मिळवलं. पण १९९० च्या दशकात प्रचंड हिट झालेला ‘डर’ हा सिनेमा आज दिव्याच्या नावावर असता, परंतु आमिर खानमुळे दिव्याच्या जागी जुही चावलाला घेण्यात आलं असा आरोप दिव्याच्या आईने तेव्हा केला होता. ही गोष्ट फार कमी जणांना माहिती आहे.

‘इंडियन आयडॉल’ फेम फरमानी नाज मंदिरासमोर उभं राहूनच गाते गाणं

डर सिनेमात आमिर खान, दिव्या भारती आणि सनी देओल हा त्रिकोण दिसणार होता. पण आमिरला दिव्याऐवजी जुही हवी होती. दरम्यान काय किल्ल्या फिरल्या आणि डर हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा त्यात शाहरूख खान, जुही चावला आणि सनी देओल हे त्रिकूट दिसलं. गंमत म्हणजे दिव्याची आई या कारणासाठी आमिरला दोषी धरत असताना, आमिरचाही पत्ता या सिनेमातून कापल्याचं दिसतंय.


दिव्याच्या आईने केलेल्या आरोपानुसार डर सिनेमाची ऑफर दिव्याने स्वीकारली होती. दरम्यान दिव्या एका शोसाठी अमेरिकेला गेली. तिकडून परत आली तेव्हा डर सिनेमातील कलाकारच बदलले होते. अमिर खानला दिव्या ऐवजी जुही हवी असल्यानेच हा सिनेमा दिव्याच्या हातून गेला. याचं खापर दिव्याच्या आईने आमिर खानच्या डोक्यावर फोडलं आहे. आमिरनेच दिव्या भारतीऐवजी जुहीचं नाव पुढं केलं असंही दिव्याच्या आईचं म्हणणं आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचं झालं ब्रेकअप? २ वर्षांपूर्वीच आलाय दुरावा!

या सिनेमाच्या निर्मात्यांशी दिव्याच्या आईचा वाद झाला होता, म्हणून दिव्यानेच या सिनेमाला नकार दिला असाही सूर वर्तवण्यात आला होता. आता खरं खोटं कोण जाणे पण ३० वर्षानंतर डर सिनेमा, त्यातील कलाकारांची अदलाबदली आणि आमिर खानवर दिव्याच्या आईने केलेले आरोप याची चर्चा मात्र चवीने रंगायला लागली आहे.

‘संजय माझ्याकडे नटरंगसाठी आलेला पण…

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.