मुंबई- टीव्ही जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. हिंदी-गुजराती चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले अभिनेते रसिक दवे यांचे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. किडनी निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. गेली १५ दिवस त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

रसिक यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे यांच्याशी लग्न केले. रसिक यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. ‘भाभीजी घर पर हैं’ मधील मलखानची भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भानच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अजून सावरले नाहीत की अजून एका निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रसिक दवे हे गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. दोन वर्षांपासून ते डायलिसिसवर होते. गेल्या १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना इस्पितळात दाखल केले होते. किडनी निकामी झाल्याने २९ जुलै रोजी त्यांनी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. ‘मासूम’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. काही वर्ष सिनेसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर त्यांनी ‘संस्कार’ या टीव्ही मालिकेतून पुनरागमन केले.


ते ‘सीआयडी’ आणि ‘कृष्णा’सह अनेक मालिकांमध्ये दिसले आहेत. दरम्यान, रसिक यांनी टीव्ही अभिनेत्री केतकी दवे यांच्याशी लग्न केले. दोघांना रिद्धी आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत. रसिक आणि केतकी रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाले होते. २००६ मध्ये आलेल्या ‘नच बलिए’ मध्ये दोघे दिसले होते. दोघेही गुजराती थिएटर कंपनी चालवत होते.

‘संजय माझ्याकडे नटरंगसाठी आलेला पण…

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.