म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ः मूळ रत्नागिरीकर असलेल्या व सध्या वास्तव्यास चेंबूर येथे असलेल्या हलदे कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कुटुंबातील आयुष हलदे हा तरुण हवाई दलात अधिकारी झाला असून हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून त्याची निवड झाली आहे.

आयुषचे वडील प्रकाश हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील देवखेरकी या गावचे रहिवासी आहेत. नोकरीनिमित्त ते मुंबईत असतात. आयुषला सहाव्या वर्गापासूनच हवाई दलात जाण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने औरंगाबादच्या सैनिकी शाळेत इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. तेथून त्याने राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा मुलाखतीसाठी निवड झाली, पण अंतिम निवड होऊ शकली नाही.

यानंतरही आयुष खचला नाही. त्याने पदवी घेतली. पदवीचा अभ्यास करीत असतानाच हवाई दलाची ‘अफकॅट’ ही प्रवेश परीक्षा दिली. त्यात पहिल्याच प्रयत्नात त्याची निवड झाली. हैदराबाद येथे दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आता अधिकारी होऊन हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी तो ३ जुलै रोजी दिंडीगल येथे जात आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांचे असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.