मुंबई : मराठी तसंच हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या नैसर्गिक अभिनयानं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अमृता सुभाष (Amruta Subhash) चं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. अमृताला अभिनयाचा वारसा तिच्या आईकडून म्हणजे ज्योती सुभाष यांच्याकडून आला आहे. ज्योती सुभाष देखील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. अलिकडेच ज्योती सुभाष यांनी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचा एक अफलातून व्हिडिओ अमृतानं सोशल मीडियावर शेअर केला.


वयाची ७५ गाठलेल्या ज्योती यांचा उत्साह एखाद्या तरुण कलाकाराला लाजवेल असाच आहे. त्याचं प्रत्यंतर अमृतानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून नक्की येतो. व्हिडिओ शेअर करत अमृतानं तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृतानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘आई काल ७५ वर्षांची झाली. तिनं मला आयुष्यात ज्या लाखमोलाच्या भेटी दिल्यात त्या सगळ्या या व्हिडिओत दिसतात. सुंदर गाणं, नाच, अभिनय आणि अचूकतेची आस. आपल्या कलेतून आयुष्यावर भरभरून प्रेम करणं. मी तुझी ऋणी आहे. आई तू एक आनंदाचा धबधबा आहेस! खूप प्रेम.’

अखेर आमिर खान बोलला- ‘माझं देशावर प्रेम नाही असं का वाटतं?’

या व्हिडिओमध्ये ज्योती अमृताला एका डान्सची स्टेप दाखवताना दिसत आहे. दरम्यान, अमृतानं शेअर केलेल्या या व्हिडिओवर सुयश टिळक, सुकन्या मोने, फुलवा खामकर, अनुप सोनी अशा अनेक कलाकारांनी कॉमेन्ट केल्या आहेत.


अलिकडेच अमृताची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा ‘सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड’ सीरिज झी ५ वर प्रदर्शित झाली. त्यामध्ये अमृतानं सुमनिया ही भूमिका अतिशय सुरेख साकारली. प्रेक्षकांचाही या सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

‘संजय माझ्याकडे नटरंगसाठी आलेला पण…

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.