मुंबई: बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाझ खान आज ०४ ऑगस्ट रोजी ५५ वा वाढदिवस साजरा (Arbaaz Khan Birthday) करत आहे. अरबाझ खानसह सर्वच खान ब्रदर्सची लव्ह लाइफ चर्चेत राहिली आहे. अरबाझ याने तर १९ वर्षांचा संसार केला अन् तो आता दुसऱ्या तरुणीला डेट करत आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक होती मलायका अरोरा आणि अरबाझ खान (Malaika Arora and Arbaaz Khan) यांची जोडी. पण त्यांनी १९ वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला आणि तो चाहत्यांसाठी धक्कादायक निर्णय होता. आता मलायका अर्जुन कपूरला डेट करत असून लवकरच त्यांच्या लग्नाची खुशखबरही मिळू शकते. तर अरबाझ खान जॉर्जिया अद्रियानी (Arbaazz Khan Girlfriend) हिला डेट करत आहे.

हे वाचा-नवव्या वर्षी केलं होतं सिनेमाचं दिग्दर्शन, जॅकी श्राॅफकडून करून घेतलं होतं काम, गिनीज बुकात नाव

मलायका आणि अरबाझ यांचा घटस्फोट नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांनी २०१७ साली वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पोटगी म्हणून अरबाझने मलायकाला दिलेली रक्कम थक्क करणारी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरबाझने मलायकला १५ कोटी एवढी रक्कम पोटगी म्हणून दिली होती. मलायकाने त्याच्याकडे पोटगी म्हणून १० कोटी रुपये मागितले होते, तरी अभिनेत्याने तिला १५ कोटी मागितल्याने समजते.


मलायका आणि अरबाझ यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. कॉफीची एक जाहिरात करताना या दोघांची भेट झाली होती. त्यांची कहाणी पहिल्या भेटीतील प्रेमाची होती. थोडेथोडके नाही, या कपलने जवळपास 5 वर्ष डेट केले. १९९८ मध्ये मलायका आणि अरबाझ यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक अरहान नावाचा १५ वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र २०१७ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.