मुंबई :आई कुठे काय करते मालिकेत नुकतीच वटपौर्णिमा साजरी झाली. त्यावेळी अनघाला पूजा कशी करायची हे सांगायला अरुंधती तिथे येते. त्यावेळी संजना आणि अरुंधतीत वादही होतात. शेखरही तिथे आलेला असतो. अनिरुद्ध मात्र सगळ्यांसमोर संजनाचा अपमान आणि अरुंधतीचं कौतुक करायचं थांबवत नाही. दरम्यान अरुंधती काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रिन्सिपलनाही भेटते.

अरुंधती मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते. इकडे ऑफिसमध्ये आशुतोषला अनिरुद्धनं मीडियाबरोबर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ मिळतो. तिखट मीठ लावून ती बातमी दिली गेली असते. त्याच वेळी आशुतोष आणि नितीन त्याच वेळी अरुंधतीला इंदौरला पाठवण्याचा निर्णय घेतात.

परतू शकतात शैलेश लोढा, बोलता- बोलता बोलून गेले दिलीप जोशी

आशुतोष तिला फोन करून तसं सांगतो. तुला इंदौरला एकटं जावं लागेल काही कामानिमित्तानं. त्या वेळी अरुंधती देशमुखांच्या बंगल्यात असते. ती थोडी गोंधळते. आपण एकटा प्रवास करणार, तेही पहिल्यांदाच विमानानं म्हटल्यावर तिला टेंशन येतं. पण तिथे असलेली अनघा आणि आप्पा तिचा आत्मविश्वास वाढवतात. त्याच वेळी अनिरुद्ध तिथे येऊन आशुतोषही बरोबर आहे का, असा खोचक प्रश्नही विचारतो.

वटपौर्णिमेला संजना लाल साडीत एकदम तयार झाली आहे. खरं तर संजनाचा हा लूक प्रेक्षकांना आवडेल असाच आहे. मला अनिरुद्ध सात जन्मी हवा, असं म्हणत संजना उत्साहानं पूजा करते. त्यानंतर धागा गुंडाळत असताना तिच्या समोर अचानक तिचा आधीचा नवरा येतो. ती गोंधळते. शेखरला पाहून संजनाला धक्का बसतो. त्याच गडबडीत गुंडाळलेला धागा तुटतो.

संजना तिथे उभ्या असलेल्या अरुंधतीला पाहून म्हणते, तुला आनंद झाला असेल ना धागा तुटला म्हणून. पूजा अर्धवट राहिली तरी पुढच्या सात जन्मात अनिरुद्धच माझा नवरा असणार. यावर अरुंधती तिला म्हणते, ‘यामुळे मला काही फरक पडत नाही. एकाच जन्मात यांनी मला सगळं दाखवलंय.’ त्यावर मागे उभा असलेल्या अनिरुद्धचा चेहरा खर्रकन उतरतो.

अखेर नीतू बोलल्याच, आलिया आल्यापासून किती बदलला रणबीर

‘आई कुठे काय करते’मध्ये साजरी होणाऱ्या वटपौर्णिमेची चर्चा; संजनाचा स्पेशल लूकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.