मुंबई : बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटवरून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर त्याचे न्यूड फोटो व्हायरल झाले आणि सगळ्यांना ४४० व्होल्टचा धक्का बसला. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर रणवीरने जे केलं ते चूक की बरोबर अशी चर्चा होत आहे.

Photo:राजकुमार रावनं खरेदी केलं जान्हवी कपूरचं आलिशान अपार्टमेंट, किंमत ऐकून झोपच उडेल!

काहींनी रणवीरवर कडाडून टीका केली आहे तर काहींनी त्याचं समर्थनही केलं आहे. ज्यांनी रणवीरला विरोध केला आहे त्यातील काही जणांनी या फोटोंमुळे महिलांचा भावनांचा अवमान होत असल्याचं सांगत त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ज्या कलमांअंतर्गंत रणवीरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे त्याला ७ वर्ष तुरुंगवासही होऊ शकतो. या सगळ्यामध्ये आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे, रणवीरला अटक होऊ शकते अशी भविष्यवाणी बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान यानं काही वर्षांपूर्वी केली होती! विश्वास नाही ना बसत पण हे सत्य आहे.


प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याच्या कॉफी विथ करण कार्यक्रमाच्या २०१६ मध्ये आलेल्या पाचव्या सिझनमध्ये शाहरुख खान सहभागी झाला होता. त्यावेळी त्यानं रणवीर संदर्भात एक भविष्य वर्तवलं होतं. हे भविष्य आज वास्तवात येताना दिसत आहे.

काय म्हणाला होता शाहरुख खान

कॉफी विथ करण (Koffee With Karan) च्या पाचव्या सिझनमध्ये शाहरुखसोबत आलियादेखील सहभागी झाली होती. यावेळी शाहरुखनं करण जोहरला सांगितलं होतं की, मला असं वाटतं की रणवीरला कपडे न घातल्यावरून तुरुंगात जावं लागेल. रणवीर त्याच्या अतरंगी कपड्यांमुळे कायमच चर्चेत असतो. कधी कधी तो असं काही घालतो की ते पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. अनेकदा तर त्याच्या ड्रेसिंग सेन्सवरून त्याची खिल्ली देखील उडवली जाते. परंतु त्याचा रणवीरवर काहीच परिणाम होत नाही. तो जे कपडे घालतो त्यात तो अतिशय आत्मविश्वासानं वावरत असतो. त्याच्या या आत्मविश्वासाचं सर्वांना कौतुकही वाटतं.

अभिनेत्री गरोदर, चाहते म्हणाले ‘मुलगा होत नाही तोपर्यंत बाळांना जन्म देणार’

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

कॉफी विथ करण ५ मध्ये करणनं शाहरुख ला विचारलं की, तू कधी असं ऐकल की रणवीर सिंगला अटक झाली आहे? त्यावर शाहरुख मजेशीर उत्तर देताना म्हणतो की, ‘हो हे नक्कीच होऊ शकते. त्यानं जे कपडे घातलेत त्यामुळे अथवा कपडे न घातल्यामुळे त्याला नक्कीच अटक होऊ शकते.’ आता ही क्लिप सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. त्यावर चाहते ही विविध प्रकारच्या कॉमेन्ट करत आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.