शिर्डी : दोन वर्षांच्या करोना निर्बंधानंतर शिर्डीचे साई मंदिर ऑक्टोबर २०२१ मध्ये भाविकांसाठी खुले झाले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात साईंच्या झोळीत तब्बल १८८ कोटींपेक्षा जास्त विक्रमी दान जमा झाले आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी ही अधिकृत आकडेवारी दिली आहे.

याचबरोबर मंदिर खुले झाल्यानंतर सात महिन्यातच ६४ लाख भाविकांनी शिर्डीला येवून साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देश – विदेशातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येतात. हे भाविक बाबांच्या दरबारात रुपये-पैसे, सोने -चांदी आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात.

Weather Alert : मुंबईला IMD कडून येलो अलर्ट, या विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा
करोना महामारीनंतर साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान दिले आहे. ७ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मे २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८८ कोटी ५५ लाख रुपये साई संस्थानच्या तीजोरीत जमा झाले आहेत.

नागरिकांनो तुमचा ब्रेकफास्ट महागणार, ब्रेडच्या किंमतीत पुन्हा वाढ; वाचा नवे दर…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.