छपरा: बिहारच्या छपरा येथे एका अजब प्रेमाची कहाणी पुढे आली आहे. येथे एका प्रियकराने प्रेयसीचं तब्बल दोन वेळा लग्न मोडलं. अखेर हे प्रकरण जेव्हा पंचायतपर्यंत पोहोचलं, तेव्हा परस्पर संमतीने पंचायतने या दोघांचं लग्न लावून दिलं. हे प्रकरण पानापूर प्रखंड मुख्यालय येथील ठाकुरबाडी मंदिर येथील आहे. येथे सर्वांच्या साक्षीने नीरज आणि बबिताने साता जन्माच्या शपथा घेतल्या.

अजब प्रेम की गजब कहाणी

आपलं प्रेम मिळवण्यासाठी नीरजने खूप प्रयत्न केले. बबिताच्या कुटुंबीयांनी दोनदा तिचे लग्न निश्चित केले. मात्र, नीरजने ते तोडलं. अखेर कुटुंबीयांनी कंटाळून आपल्या मुलीचा हात प्रियकर नीरजच्या हाती दिला. पानापूर ब्लॉक मुख्यालयात असलेल्या ठाकूरबाडी मंदिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह संपन्न झाला.

हेही वाचा –एक होता टायगर! लफडं एकाचं, दोष बिचाऱ्या वाघोबावर; तुम्हीच पाहा काय आहे प्रकरण…

दोनदा प्रेयसीचं लग्न मोडलं

नीरज हा रामपूररुद्र येथील रहिवासी आहे. तर बबिताची आजी या गावातील आहे. बबिता ही माश्रक पोलीस स्टेशन हद्दीतील हंसापीर गावातील रहिवासी आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ती तिच्या आजीच्या घरी राहायची. २०२१ मध्ये बबिताचं लग्न दुसऱ्या तरुणाशी लावून दिलं, तेव्हा नीरजने थेट बबिताचं सासर गाठलं. त्यामुळे तिचा संसार मोडला. सासरच्यांनी तिला घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर शरमेने मुलीच्या वडिलांनीही तिच्या नीरजशी तिचं लग्न लावून देण्यास होकार दिला. मात्र, या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आला.

हेही वाचा –वाढदिवसच ठरला अखेरचा! प्रेयसीच्या एका चुकीमुळे प्रियकराने उचललं धक्कादायक पाऊल

नीरज आणि बबिता अडकले अखेर लग्नाच्या बंधनात

मात्र, नीरजच्या पालकांनी दोन लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली. मुलीचे वडील ते देण्यास असमर्थ होते. हुंडा देऊ न शकल्याने मुलीच्या वडिलांनी तीन महिन्यांपूर्वी गोपाळगंजमधील बैकुंठपूरच्या जगदीशपूर गावात मुलीचे लग्न लावून दिले. मात्र, प्रियकर तरुणाने पुन्हा मुलीच्या सासररी पोहोचून तरुणीला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

तरुणाच्या धमकीमुळे सासरच्या लोकांनी घाबरून मुलीला घराबाहेर काढलं. मुलगी पुन्हा माहेरी परतली. त्यानंतर हे प्रकरण थेट पंचायतमध्ये पोहोचलं. तेव्हा तरुणाने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास होकार दिला. त्यानंतर सर्वांच्या संमतीने गावातील मंदिरात दोघांचं लग्न लावून देण्यात आलं.

हेही वाचा –जंगलात लाकडं गोळा करताना रस्त्यात सापडली ‘लाखमोला’ची वस्तू; गरीब महिलेचे नशीब फळफळले

नात्याला काही नाव नसावे; तृतीयपंथीय रुपा-प्रेमची हृदयस्पर्शी कहाणी, पुण्यात अनोखा विवाह सोहळाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.