मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) हिनं कामातून ब्रेक घेतला असून ती एकटीनं हिमाचल प्रदेशमध्ये फिरत आहे. प्राजक्ता तिच्या ट्रीपमधील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिच्या या फोटोंवर तिचे चाहते भरभरून कॉमेन्ट करत आहेत. प्राजक्ता माळी पहिल्यांदाच एकटी फिरायला गेली आहे. मात्र आता तिला त्या ठिकाणाहून पळून यावं असं वाटत आहे. तशा आशयाची पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे. त्यामुले नेमकं झालं तरी काय अशी चर्चाही सुरू झाली आहे.


काय आहे प्राजक्ताची पोस्ट

प्राजक्ता माळी तिच्या रानबाजार या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये आणि हास्य जत्रेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होती. परंतु आता तिनं या तिच्या व्यग्र दिनक्रमातून स्वतःसाठी वेळ काढला आहे आणि ती हिमाचल प्रदेशमध्ये सोलो ट्रीपला गेलीआहे. प्राजक्ता पहिल्यांदाच एकटी फिरायला गेली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ती सुट्टयांचा आनंद घेत आहे तसेच तिथले अनेक फोटो, व्हिडिओ पोस्ट करत आहे. एकूणच प्राजक्ता ही ट्रीप छान एन्जॉय करते आहे.

परंतु प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून तिचे चाहते चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘ कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीत जास्त पाच-सहा दिवस आनंद घेऊ शकते नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण यायला लागते…हो आत्ता पळून यावं; इतकी आठवण येतेय… देवा…कसं होणार माझं…’ असं म्हणत तिनं #महाराष्ट्राचीमूलगी #सह्याद्रीचीलेक हे हॅशटॅग वापरले आहेत. प्राजक्ताच्या या पोस्टवरून तिला महाराष्ट्राची, घराची व तिच्या कामाची आठवण यायला सुरूवात झाल्याचं या पोस्टवरून दिसतं आहे.

प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून रानाबाजार या वेबसीरिजमुळे ती खूपच चर्चेत आली आहे. रानबाजारमधील तिच्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक झालं. मात्र, अनेकांना तिचा या सीरिजमधील बोल्ड अंदाज फार रुचलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केलं जात आहे. दरम्यान, प्राजक्ताच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर लवकर ती ‘वाय’ सिनेमात एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.