पाहुया नेमकं काय घडलं?
अजित पवार हे चंद्रपूरमधील (Chandrapur) काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या घरी गेले होते. धानोरकरांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या निवासस्थावरुन निघताना अजित पवारांना अनेक पदाधिकाऱ्यांनी, पत्रकारांनी घेरलं. तेव्हा अजित पवार हे सर्वांशी बोलून, त्यांच्या हातातील पुष्पगुच्छ स्वीकारुन गाडीत बसायला जात होते. तेवढ्यात त्यांच्या दारापुढे दीपक जयस्वाल हे ज्येष्ठ पदाधिकारी त्यांना दिसले.
दादा दीपक जयस्वाल यांना इशारा करत म्हणाले की ‘तुला गाडीत बसायला सांगितलं होतं.’ त्यावर दीपक जयस्वाल यांनी नाराजीच्या सुरात अजित पवारांचं आपल्याकडे लक्ष नसल्याची तक्रार केली. आता मात्र, अजितदादा संतापले. त्यांनी आवाज चढवत पदाधिकाऱ्याला असं परत न बोलण्याची तंबी दिली आणि गाडीत बसले.
अजित पवार आणि दीपक जयस्वाल यांच्यातील संभाषण –
– अजितदादा: अरे तुला बसायला सांगितलं होतं ना गाडीत
-दीपक जयस्वाल: बसलो होतो न गाडीत… लक्षच नाही न तुमचं पण
– अजितदादा: एक मिनिट असं बोलायचं नाही… मी सगळ्यांशी बोलतोय… मी तसला माणूस नाही…
हेही वाचा-पिकं पाण्याखाली, गावं उद्ध्वस्त, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू, अजित पवार बळीराजाच्या बांधावर
पाहा व्हिडिओ –
“मी तसला माणूस नाही…” अजित दादांनी पदाधिकाऱ्याला फटकारलं
अजित पवारांचा वर्धा दौरा
अजित पवारांनी आज वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सरूळ गावात अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गावकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यांनी हिंगणघाट तालुक्यातील चानकी गावालाही भेट दिली; ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. आवश्यक ती मदत पुरवली जाईल, असा विश्वासही यावेळी दादांनी दिला.
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावात जाऊन ग्रामस्थांनी मांडलेल्या व्यथा ऐकून घेतल्या; त्यांची विचारपूस केली. आमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई वेळेत मिळावी, एवढीच माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. याची राज्य शासनानं तत्काळ दखल घ्यावी, असंही अजित पवार म्हणाले.
हिंगणघाट तालुक्यातील कान्होली हे गाव वर्धा व यशोदा नदीच्या संगमावर असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं ४ दिवस पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं.इथल्या घरांचं व शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य शासनानं जलद गतीनं पंचनामे प्रक्रिया पूर्ण करून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.