हैदराबाद : तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या कन्या उमा माहेश्वरी यांनी आत्महत्या केली आहे. हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरातील घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांना घरातील पंख्याला मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला. स्थानिक पोलिसांनी माहेश्वरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सीआरपीसीच्या कलम १७४ नुसार गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटुंबीयांना रविवारी मध्य रात्री उशिरा उमा माहेश्वरी यांचा मतृदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. खोलीचा दरवाजा आतून बंद करण्यात आलेला होता. प्राथमिक चौकशीतील माहितीनुसार उमा माहेश्वरी यांना मानसिक त्रास होता. पोलिसांनी उमा माहेश्वरी यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी उमा माहेश्वरी यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआरपीसी कलम १७४ नुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. उमा माहेश्वरी या एनटी रामाराव यांच्या कन्या होत्या. एनटी रामाराव हे तेलुगू देसम पक्षाचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण, जिओने मारली बाजी; तब्बल ‘एवढ्या’ कोटींची लागली बोली

उमा माहेश्वरी या एनटी रामाराव यांच्या कन्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या गग्गुबाती पुरनदेश्वरी आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्या भगिनी आहेत. या घटनेची माहिती मिळताच चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि कुटुंबातील इतर सदस्य उमा माहेश्वरी यांच्या घराकडे रवाना झाले.

माफी मागितली नाही मागायला लावली, ही प्रत्येक मराठी माणसाची लढाई : जितेंद्र आव्हाड

भावंडामध्ये सर्वात लहान

तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक एनटी रामाराव यांना एकूण १२ मुलं होती. उमा माहेश्वरी या सर्वात लहान होत्या. एनटी रामाराव यांच्या चार मुलींमध्ये त्या सर्वात लहान होत्या. एनटी रामाराव तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक आणि मुख्यमंत्री राहिले आहेत.

माझ्याकडून चूक झाली क्षमा करा; अखेर राज्यपालांचा माफीनामा आलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.