मुंबई : साधारण २५ वर्षांपूर्वी सिनेमाच्या जगतात पाऊल ठेवणारी महिमा चौधरी सध्या चर्चेत आहे. परदेस सिनेमानंतर ती फारशी समोर आली नाही. तिनं व्यावसायिक बाॅबी मुखर्जीबरोबर लग्न केलं. पण ते लग्न टिकलं नाही. घटस्फोटानंतर मुलगी आर्यानाला तिनं स्वत:च वाढवलं. अर्याना आता १५ वर्षांची होईल. काही दिवसांपूर्वी महिमानं सांगितलं की तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला. महिमा सांगते, या कठीण काळात लेक आईच्या पाठी उभी राहिली. तिनं आपल्या आईची पूर्ण काळजी घेतली. दोन महिने मुलगी शाळेतही गेली नव्हती.

महिमा चौधरी सध्या अनुपम खेरबरोबर द सिग्नेचर सिनेमाचं शूटिंग लखनौला करत आहे. ती म्हणाली, कॅन्सरवर उपचार मी अमेरिकेत नाही, तर मुंबईत घेतले. आता ती कॅन्सरमुक्त आहे.

महाकालच्या खुलाश्यांनी सलमान खानच्या केसला आलं नवं वळण

दोन महिने अर्याना शाळेत नाही गेली


४८ वर्षांची महिमा चौधरी आपल्या मुलीबद्दल सांगत होती. ती म्हणाली, ‘तिनं मला साफ सांगितलं की ती घरीच राहील. कारण तिला करोना व्हायरस घरी आणायचा नव्हता. कारण मी बरी होत होते. तिला कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती. म्हणून जेव्हा शाळा सुरू झाल्या, तेव्हाही ती शाळेत गेली नाही. ऑनलाइन अभ्यास केला.’

अनुपम खेर यांनी दिला पाठिंबा


अनुपम खेर यांनी महिमाला यूएस नंबरवरून फोन केला होता, त्यामुळे तिला समजलं की हा एक महत्त्वाचा फोन असेल आणि त्यामुळे तिने तो पटकन उचलला. अनुपम यांनी तिला एका सिनेमात काम करण्याबद्दल विचारायला फोन केला होता. यावर महिमा म्हणाली की तिला हा सिनेमा करायला आवडेल पण अनुपम यांना थोडी वाट पाहावी लागेल. आता ती द सिग्नेचर सिनेमाचं शूटिंग करत आहे.

कोणत्याही राजवाड्यापेक्षा कमी नाही कंगना रणौतचं दुसरं घर

महिमाला तिची मैत्रीण छवी मित्तलचीही खूप मदत मिळाली. छवीलाही ब्रेस्ट कॅन्सर झाला होता.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.