मुंबई :आई कुठे काय करते मालिकेत सध्या अनिरुद्ध अरुंधतीच्या गुड बुकमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे. तो अरुंधतीच्या गाण्याच्या रेकाॅर्डिंगलाही जातो. तिनं फटकारलं तरीही तो तिच्याशी प्रेमानं वागतोय. अरुंधतीला त्याचा कावा कळतोय. संजनाशी मात्र अनिरुद्ध अक्षरश: वाईट वागतोय. त्याला संजनाकडून घटस्फोट हवाय. अरुंधती परत घरी यायला हवीय.

नाटक सुरू असताना भरत थांबला, अन् महापौरांनाच फोन लावला

इकडे संजनाला जेव्हा जाणवतं की अनिरुद्ध अरुंधतीकडे झुकतोय. तेव्हा ती अरुंधतीच्या थेट घरी जाते आणि तिला प्रश्न विचारते. संजना म्हणते, ‘तू आणि अनिरुद्ध एकत्र येणार आहात का?’ त्यावर अरुंधती तिला म्हणते की, लग्न झालेल्या परक्या पुरुषाच्या प्रेमात पडणारी बाई मी नाही.’ सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अरुंधतीच्या बाणेदार उत्तराबद्दल तिचे चाहते कौतुक करत आहेत.

कावेबाज अनिरुद्ध
अनिरुद्धनं आयुष्यभर अरुंधतीला त्रास दिला. तिचा पदोपदी अपमान केला. तिला कधी गाऊ पण दिलं नाही. तिचा तानपुरा फेकून दिला. तोच अनिरुद्ध अरुंधती घरी परत यावी म्हणून प्रयत्न करत आहे. त्याचं अरुंधतीवर प्रेम नाही. पण घराची विस्कटलेली घडी नीट बसावी म्हणून ते हे सगळं करतोय. यामागेही त्याचा स्वार्थ आहेच.

अरुंधती बदलतेय
काही दिवसांपूर्वी अरुंधतीची मुलगी ईशाचं साहिलबरोबर ब्रेकअप झालं. साहिल आणि ईशाची गाठ रस्त्यात पडते. ईशा त्याला अडवायला जाते. तसा साहिल तिला झिडकारतो. ईशाला ढकलतो. तेव्हा तिथे असलेली अरुंधती साहिलच्या कानाखाली वाजवते. त्याला म्हणते, माझ्या मुलीवर हात उगारायची तुझी हिंमतच कशी झाली? तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झालाय, यात तिची काय चूक?

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नयनताराला मिळाली लीगल नोटीस, बालाजी दर्शन पडलं महागातSource link

Leave a Reply

Your email address will not be published.