मुंबई: सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचा बोलबाला आहे. खान, कपूर किंवा बच्चन या सर्वच कुटुंबांमधील स्टारकिड्स नवनवीन सिनेमांमध्ये दिसत आहेत किंवा त्यांचे चित्रपट प्रदर्शनासाठी रांगेत आहेत. सिनेमामध्ये पदार्पण करण्याआधीच (Bollywood Star Kids) यांची चर्चा सुरू होते, अनेक स्टारकिड्स सोशल मीडियावरही सध्या विशेष सक्रिय आहेत. दरम्यान एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या मुलामुलींच्या अफेअरची चर्चाही हमखास रंगते. प्रेक्षकांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात रस असतो. मात्र अशी एक स्टारकिड आहे, जिचं करिअर एका अफेअरमुळे संपलं. ही अभिनेत्री म्हणजे प्रतिभा सिन्हा! तिची आई माला सिन्हा एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

हे वाचा-दीपूच्या मंगळसूत्राचं डिझाइन पाहिलं का? चाहत्यांना आठवली ‘वैदेही’; पाहा Photo

प्रतिभाने सिनेमांमध्ये काम अवश्य केलं, पण तिला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जातो की म्युझिक डायरेक्टर नदीम याच्यासह तिचे कथित अफेअर होते, हेच तिचं करिअर संपण्याचं मुख्य कारणही होतं. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे नमुद करण्यात आले आहे, प्रतिभाने तिच्या करिअरपेक्षा नदीमसह असणाऱ्या रिलेशनशिपकडे अधिक लक्ष दिले. परिणामी तिने जवळपास १२ चित्रपट करूनही तिला या सिनेविश्वात स्वत:ची अशी वेगळी जागा निर्माण करता आली नाही.

Pratibha Sinha in Pardesi Pardesi

‘परदेसी-परदेसी’ गाण्यातील एक दृश्य (फोटो सौजन्य- युट्यूब)

प्रतिभा ‘परदेसी-परदेसी’ या ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातील गाण्यामुळे विशेष चर्चेत आली होती. मात्र नदीमशी नाव जोडले गेल्याचे तिच्या आईलाही आवडले नव्हते. अभिनेत्री माला त्या दोघांच्या नात्याच्या विरोधात होत्या. नदीम हे नाव ९० च्या दशकात विशेष चर्चेत आले होते. गुलशन कुमार (Gulshan Kumar) हत्याकांड प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर नदीम लंडन याठिकाणी वास्तव्यास गेला अन् त्यांचे नाते संपुष्टात आले.

Pratibha Sinha

प्रतिभा सिन्हा आणि माला सिन्हा

वाचा-काहीही न बोलता खास व्यक्तींसह मिलिंद गवळींच्या गप्पा,अनिरुद्धची पोस्ट जिंकतेय मनं

मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या प्रतिभा तिची आई माला यांच्यासह मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. २००० साली तिने तिचा शेवटचा चित्रपट ‘ले चल अपने संग’ केला. अभिनेत्रीने ‘दिल है बेताब’, ‘मिलिट्री राजा’, ‘तू चोर मैं सिपाही’, ‘कल की आवाज’ तसंच ‘पोकिरी राजा’ यासारख्या सिनेमात काम केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.