आग्रा: उत्तर प्रदेशच्या आग्र्यात एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. सरकारी नोकरी न मिळाल्यानं तरुणानं यमुना नदीत उडी घेतली. दोन दिवसांनंतरही तरुणाचा शोध लागलेला नाही. न्यू आग्रा येथील तलफी गावात ही घटना घडली. तरुणानं नदीत उडी मारण्यासाठी व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवलं होतं.

माझे आई बाबा खूप चांगले आहेत. मात्र मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मी सरकारी नोकरी मिळवू शकलो नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे, असं तरुणानं व्हॉट्स ऍप स्टेटसमध्ये लिहिलं होतं. या तरुणाचं नाव कर्मवीर सिंह आहे. पाणबुड्यांच्या मदतीनं त्यांचा शोध सुरू आहे.
भावासाठी ४६ कोटी उभारले, पण स्वत: मृत्यूसोबतची झुंज हरली; १६ वर्षीय मुलीची हृदयद्रावक कहाणी
कर्मवीर सिंह लष्करी भरतीसाठी तयारी करत होता, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय विक्रम सिंह यांनी दिली. कर्मवीरनं सरकारी नोकरीसाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता, असं कर्मवीरच्या कुटुंबीयांनी सांगितलं. रविवारी रात्री उशिरापर्यंत कर्मवार घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचा मोबाईल आणि चप्पल यमुना नदीच्या तीरावर असलेल्या नावेत सापडली.

पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीनं कर्मवीरचा शोध सुरू केला. दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप तो सापडलेला नाही. कर्मवीरचा मृत्यू झाला असावी अशी भीती वर्तवण्यात येत आहे. तर कुटुंबीयांना कर्मवार परत येईल, अशी आशा आहे. कर्मवीरचा शोध लागत नसल्यानं त्याचं कुटुंब चिंतेत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.