Relationship Tips : आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला जागा देणे ही गोष्ट सोपी नसते. एखादे नाते टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण आज कालच्या जगात गोष्टी फार बदल्या आहेत. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची कोणती गोष्ट आवडली नसेल तर आपण त्या व्यक्तीपासून दूर होतो.पण नातं जपण्याचा प्रयत्न करत नाही.

आजकालची नाती फार लवकर संपतात. नाते तुटल्यावर असं का झालं या गोष्टीचा आपण विचार करत राहतो. ही नाती एवढी लवकर का मोडतात या प्रश्नाचे उत्तर लेखिका सुधा मूर्ती यांनी दिली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्यामुळे आज कालची नाती फार लवकर मोडतात.
(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )

​पैसा

आजच्या काळात पैसाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. या गोष्टीचा समावेश आता आपल्या खाजगी आयुष्यात देखील झाला. आज काल लोकांसाठी पैसा फार महत्त्वाचा झाला आहे. आजकाल कोणत्याही गोष्टीची तुलना लोक पैशामध्ये करतात. या गोष्टीमुळे नात्यात कटूता निर्माण झाली आहे. पैसा महत्त्वाचा आहे पण माणसापेक्षा नाही.

(वाचा :- नात्यातील कटूता कमी करण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा, नात्याला द्या नवसंजीवनी)

​प्रेम

लोक प्रेम करताना विचार करत नाही. प्रेमाचे दुसरे नाव म्हणजे त्याग. पण आज काल लोकांना प्रेमात सर्व गोष्टी लागतात. जर तुमचे प्रेम निस्वर्थी असेल तर तुम्ही कधीही वेगळे होऊ शकणार नाही. त्यामुळे प्रेमात काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे शिका. जो जसा आहे त्याला तसे स्विकारा.

(वाचा :- माझी कहाणी : एक दिवस माझा नवरा पाठलाग करत माझ्या ऑफिसमध्ये आला अन् आमच्यातील सगळंच संपलं, कारण ऐकून व्हाल थक्क)

मनातील ​गोष्टी शेअर न करणे

आज काल लोक फोन आणि कामात एवढे व्यस्त झाले आहेत की आपल्या जवळच्या लोकांची किंमत खूप कमी झाली आहे. आपल्या व्यक्तीसोबत गोष्टी शेअर करणे त्यांना कळतच नाही. तुम्ही जर तुमच्या मनातील गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यात तर तुमच्यातील प्रेम कायम राहण्यास मदत होईल.

(वाचा :- स्वत:चं मुलंच ठरलं प्रेमात अडथळा, प्रेमाच्या परीक्षेत पत्नी सपशेल फेल असा नव-याचा आरोप..!)

​माणसात गुंतवणुक करा

माणसांमध्ये गुंतवणुक करा याचा फायदा तुम्हाला होईल.पैसा किंवा जागा यागोष्टी आयुष्यभर पुरत नाहीत. त्यामुळे माणसांमध्ये गुंतवणुक करा.

(वाचा :- Relationship Tips : दोघांत तिसरा ! या ५ गोष्टी सांगतील तुमच्या नात्यात आहे तिसरा व्यक्ती)

​एक मर्यादेपर्यंत पैसा लागतो

पैसा आपल्याला एका मर्यादेपर्यंत लागतो त्यामुळे माणसांमध्ये गुंतवणुक करा. घर घेणं मुलांची शिक्षण, मुलभूत गरजा या गोष्टींसाठीच आपल्याला पैसा लागतो. त्यामुळे माणसांमध्ये गुंतवणुक करा.

(वाचा :- कधीच तुटणार नाही नातं, फक्त फॉलो करा गौर गोपल दास यांनी सांगितलेल्या ‘या’ 5 गोष्टी..!)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.