शिवसेनेचं हिंदुत्त्व हे संभाजीराजांसारखं आहे. प्राण जाय पण वचन जाय, असं आहे. काल त्या संभाजीनगर ला हैदराबादहून कोण आलं होतं. ओवेसीनं औरंगजेबाच्या कबरीपुढं माथा टेकला. आम्ही त्याचा निषेध करतो. खरी गम्मत पुढं आहे. भाजपची पिलावळ उभी राहिली, ठाकरेंच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात येतो आणि औरंगजेबापुढं नतमस्तक होतो, काय कारवाई करणार असं विचारता. काँग्रेसच्या सरकारच्या काळात आणि देवेंद्र फडणवीसाच्या काळात तो आपल्या इकडं आला होता. त्यावेळी तुम्ही का कारवाई केली नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी भोगलं ते आज आपण भोगतोय त्याची मूळं गुजरातच्या त्या गावात आहेत. काश्मीरमध्ये गेल्या तीन महिन्यात २७ काश्मिरी पंडितांची हत्या झाली. त्या बातम्या तुमच्यापुढं येत नाहीत. परवा राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची हत्या झाली. काल आणि आज काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले त्यावेळीू केंद्रानं त्यांच्यावर अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या, असं संजय राऊत म्हणाले. काल पुलगाम मध्ये दोन पोलीस अधिकारी मारले गेले. काश्मीरमध्ये धोक्याची घंटा वाजते आहे. शिवसेनेकडे बोटं दाखवू नका, शाहिस्तेखानाप्रमाणं तुमची बोटं छाटली जातील, असं संजय राऊत म्हणाले.