क्लिक करा आणि वाचा- रेल्वे स्थानकावर सापडले ६ लाखांचे दागिने, महिलेने जे केले त्याने तुम्हालाही अभिमान वाटेल
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे यांना विजयासाठी तीन ते चार मते मिळवावी लागणार आहेत. खडसे ही मते कोठून मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खडसे यांच्या भाजपमधील निकटवर्तीय त्यांना मते देतील हा हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. भाजप आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) हे एकनाथ खडसे यांना आपले मत देतील असे बोलले जात आहे.
क्लिक करा आणि वाचा- रात्री एकत्र जेवण, सकाळी वहिनीने घरात डोकावलं, तर तृतीयपंथीसोबत घडलेलं असं काही…
याबाबत खुद्द सावकारे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे. याबाबत सावकारे यांना विचारले असता ते म्हणाले की, एकनाथ खडसे हे माझ्यासाठी आदर्श आहेत. मी आजही त्यांना मानतो. मात्र, मला पक्ष सांगेल त्यांलाच मी मतदान करणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- …तर खडसेंना मतदान करेन, ‘कट्टर वैरी’ अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची भूमिका
असे असले तरी, संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. म्हणून ते नक्कीच खडसे यांना मत देतील असे बोलले जात आहे. सावकारे हे एकनाथ खडसे यांच्यामुळेच आमदार होऊ शकले असेही म्हटले जात असते.