अकोला: विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह प्रमुख पदाधिकारी शिंदेंना पाठिंबा दिलाय. यानंतर अकोल्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला. या संदर्भात बाजोरियांनी आज पत्रकार परिषद घेत मनातील खंत व्यक्त केली. आपण मागील काळात उध्दव साहेबांना उपसभापती पद मागितलं. तेव्हा अडीचं वर्षानंतर दिल्या जाईल, असं आश्वासन दिले, त्यानंतर नाराजीच हाती आली.

पक्षातील लोकांमुळे पराभव – गोपीकिशन बाजोरिया

तर जिल्ह्यातील पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा पराभव झाला. या पदाधिकाऱ्यांच्या अनेकदा उध्दव ठाकरे (Uddhav Thcakeray) यांच्याकड तक्रारी केल्या. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही, असं गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) म्हणाले.

हेही वाचा –विधानसभेनंतर आता विधानपरिषद आमदारही टार्गेट? शिंदेंनी ठाकरेंचा शिलेदार फोडला

कधीच कुठल्या पदाची मागणी केली नाही – गोपीकिशन बाजोरिया

नगरसेवक, तिनदा विधानपरिषद आमदार राहिलो. मात्र, ठाकरेंकडून नाराजी राहिली. कधीही कोणत्या प्रकारचं मंत्रिपद मागितलं नाही. गेल्या २५ वर्षात फक्त वेदना पाहायला मिळाल्या असेही ते म्हणाले. दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विदर्भाला कोणतेही मंत्रिपद शिवसेनेला दिलं नाही. अशा अनेक गोष्टींची खंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

हेही वाचा –उद्धव ठाकरे यांनी लीलाधर डाकेंना ५ तास मातोश्रीबाहेर बसवून ठेवलं होतं: रामदास कदम

गोपीकिशन बाजोरियांसह अनेक जण शिंदे गटात

अकोल्याचे माजी विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी गुरुवारी (२८ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बाजोरिया शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, काल बाजोरियांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश घेतला. शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या सह्याद्री अतिथी गृहावर हा प्रवेश समारंभ झाला.

हेही वाचा –मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला? सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार शिंदे गटातून कुणाला संधी?

वडील तीन वेळा सेना आमदार, मुलगा विधानपरिषदेवर मात्र आता शिंदेंना साथSource link

Leave a Reply

Your email address will not be published.