चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
आम्ही त्यांच्या नेत्यांच्या मतासंदर्भात आक्षेप घेतल्यानं अशा प्रकारचा आक्षेप घेण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांची मतपत्रिका मी हातात घेतली हा आक्षेप घेतला जातोय तो चुकीचा आहे. निवडणूक आयोगाचे चित्रीकरण तिथं सुरु होतं, त्यामध्ये सर्व दिसेल. मी मतपत्रिकेला हात लावलेला नाही. नियमांमध्ये राहून मी मतपत्रिका पाहिली, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
चुरस वाढली! मविआची हक्काची २ मतं निकालात निघाली; अपक्षांच्या हाती विजयाची चावी?
भाजपच्या तक्रारीवर पुन्हा सुनावणी सुरु
जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांच्यासंदर्भातील भाजपच्या आक्षेपावर पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. भाजपनं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मतपत्रिका राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या हातात दिल्याचा आरोप केला होता. तर, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांना मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. सुहास कांदे यांच्यासंदर्भात देखील या प्रकारचा आक्षेप घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादीत आल्यानंतर आज मला न्याय मिळाला; उमेदवारी अर्जानंतर खडसेंची प्रतिक्रिया
राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कधी?
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेतील २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. आता, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचं मतदान होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं मतदान पूर्ण झालं असून आता सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि ७ वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार बाजी मारणार की धनंजय महाडिक विजयी होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीला दिलासा! आव्हाड, ठाकूर यांची मतं वैधच; भाजपचे आक्षेप फेटाळले 92007045