[ad_1]

नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी Apple पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आयफोन १५ सिरीज लाँच करणार आहे. त्याच वेळी, iOS 17 हे अपडेट देखील येणार असून त्याची घोषणा आधीच झाली आहे. या अपडेटमुळे फोनचा चेहरामोहरा बदलणार असून स्टँडबाय मोडसह, जनरल अॅप्समध्येही बरेच रोमांचक बदल यावेळी होणार आहेत. पण दरवेळीप्रमाणे या अपडेटनंतरही मार्केटमधील काही जुने युजर्स आपला आयफोन अपडेट करु शकणार नाहीत आणि त्यांचा आयफोन अपडेट न झाल्यामुळे त्याचा उपयोगही नसेल. चलातर जाणून घेऊ कोणते फोन iOS 17 ला सपोर्टेड आहेत आणि कोणते नाहीत…

iOS 17 खालील फोनशी कम्पेटेबल नसेल:
तुमच्याकडे iPhone X किंवा त्याहून जुनं मॉडेल असल्यास, तुम्ही नवीन अपडेट वापरू शकणार नाही. यामुळे तुम्हाला लेटेस्ट फीचर्सही वापरता येणार नाहीत.

iOS 17 खालील फोनवर वापरता येईल:
iPhone XS, iPhone XS Max, iPhone XR, iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max, iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max , iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, iPhone SE (2nd Genration आणि नंतरचे), iPhone 14 (प्लससह) आणि iPhone 14 Pro. तुमच्याकडे यापैकी कोणताही फोन असल्यास, लवकरच तुम्हाला नवीन अपडेट मिळू शकेल.

आयफोन मॉडेल कसे तपासायचे?
जर तुम्हाला माहित नसेल की तुम्ही कोणता आयफोन वापरत आहात, तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन ते तपासू शकता. प्रथम सेटिंग अॅपवर जा. त्यानंतर General वर जाऊन About वर जा. येथे तुम्हाला मॉडेलचे नाव कळेल.

iOS 17 अपडेट कसे डाउनलोड करावे?
यासाठी तुम्हाला सेटिंग अॅपवर जाऊन जनरलमध्ये जावे लागेल. त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय उपलब्ध होईल, त्यावर टॅप करा. तुमच्या फोनमध्ये अपडेट आले आहे की नाही हे तुम्हाला येथे कळेल. लेटेस्ट उपलब्ध असल्यास, ते डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *