ISI ने केली मूसेवालाची हत्या? दहशतवाद्याचा मित्र निघाला बिश्नोई
उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी मनोरंजन विश्वातलं एक ताजंतवानं कपल आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या जोडीचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी नेटकरी आतूर असतात. उमेश आणि प्रियाची जोडी आवडणाऱ्या चाहत्यांकडूनही त्यांच्या फोटोवर कमेंट येत असतात. उमेशही सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असतो. त्यामुळे त्याच्या पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. नुकताच उमेशने त्याला खजिना मिळाला अशी कॅप्शन लिहून दोन फोटो पोस्ट केले आहेत. आता उमेशनच्या हाताला नेमका काय खजिना लागला हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नसेल तरच नवल.
उमेशने काही व्हिसीआर, कॅसेट यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत उमेशनं असं लिहिलं आहे की, घराची साफसफाई करताना मला काही गोष्टी सापडल्या. माझ्या घरी आलेला पहिला व्हिसीआर माझ्या हाती लागला. आज माझ्या हातात आधुनिक गॅझेटस आहेत पण या व्हिसीआरची किंमत त्याला नाही.’
४ हात आणि ४ पाय असलेल्या चिमुकलीला सोनू सूदची मदत, शस्त्रक्रियेनंतर अशी दिसतेय चौमुखी
‘माझ्या आयुष्यातील पहिल्या मालिका, त्यातील सीन, माझे कार्यक्रम आईबाबांनी रेकॉर्ड करून या सीडीमध्ये ठेवले आहेत. त्यांना माझ्या अभिनयाचं खूप कौतुक होतं. मी सुरूवातीच्या दिवसात केलेल्या अभिनयाचं संचित हा माझ्यासाठी खजिनाच आहे. या आठवणी माझ्या स्मरणात कायम राहतील. ते दिवस पुन्हा कधीही येणार नाहीत. उमेशच्या या कॅप्शनवर चाहत्यांनी खूप हार्ट इमोजी पाठवले आहेत.
उमेशचा मोठा भाऊ जयेश हा चंद्रलेखाच्या नाटकात काम करायचा. त्याचं नाटक बघायला उमेश आईबाबांसोबत जायचा. तेव्हा उमेशलाही नाटकात काम करण्याची संधी मिळाली. रणांगण हे उमेशचं पहिलं नाटक. त्यानंतर उमेशने खूप नाटकं केली. आभाळमाया, किमया, असंभव या मालिकांमध्येही उमेशने अभिनय केला. समर एक संघर्ष या सिनेमात उमेशने दिव्यांग मुलाची भूमिका केली. काही दिवसांपूर्वी अजूनही बरसात आहे या मालिकेत मुक्ता बर्वेसोबत उमेश दिसला.
त्याची जोडी जमली ती बायको प्रिया कामतसोबत. आणि काय हवं या वेबसिरीजलाही खूप प्रतिसात मिळाला. नवा गडी नवं राज्य हे नाटक आणि त्यावर बेतलेला टाइमप्लीज हा सिनेमाही गाजला. सध्या उमेश दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक करत आहे. अभिनयाच्या प्रवासात इथंपर्यंत आल्यानंतर जेव्हा उमेशला घर स्वछता करत असताना आईबाबांनी रेकॉर्ड केलेल्या त्याच्या पहिल्या मालिका आणि नाटकाच्या व्हिसीआर बघून उमेश त्याच्या जुन्या काळात हरवून गेला. कितीही पैसे मिळाले तरी त्याला सापडलेला हा खजिना नेहमीच अमूल्य राहिल असं म्हणत चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलंय.
कोणीच चूक नाही कोणीच बरोबर नाही, असं का बोलतेय अरुंधती