चेन्नई: ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए.आर. रहमानची मुलगी खतिजा रेहमान (Khatija Rahman Wedding) आणि जावई रियासदीन शेख मोहम्मद यांच्या लग्नाचे रिसेप्शन शुक्रवारी १० जून रोजी पार पडलं. यावेळी बड्या कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. तमिळनाडूचे मुख्यमंत्री ते संगीत क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत अनेकांनी या रिसेप्शनला (AR Rahman Daughter Wedding) हजेरी लावली होती. यामध्ये एक मराठमोळा चेहरा देखील होता. हिंदी आणि मराठी चित्रपसृष्टीमध्ये दर्जेदार गाणी देणारी गोड गळ्याची गायिका ‘बेला शेंडे’ यावेळी उपस्थिती होती.

हे वाचा-भारती आणि हर्ष यांच्या मुलाचं झालं बारसं, गोलाऐवजी या नावानं मारणार हाक

गायिका बेला शेंडे हिने खतिजा हिच्या रिसेप्शनमधील फोटो शेअर करत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर या ग्रँड रिसेप्शनचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. गायिका बेला शेंडे हिने देखील या सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. एआरआर फिल्मसिटी (ARR Filmpcity) याठिकाणी पार पडलेल्या या रिसेप्शनसाठी बड्या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती.

हे वाचा-पुन्हा एकदा विकी-कतरिनाने केलं लग्न, बॉलिवूडकर झाले वऱ्हाडी! पाहा Viral Video

‘या सुंदर जोडप्याला खूप प्रेम आणि आनंदाच्या शुभेच्छा’, अशी कॅप्शन देत बेला शेंडे (Bela Shende at Khatija Rahman Wedding Reception) हिने खतिजाच्या रिसेप्शनमधील फोटो शेअर केले आहेत. या सोहळ्यासाठी बेला शेंडे व्यतिरिक्क मनीषा कोइलारा, सोनू निगम, हनी सिंग, मणी रत्नम, शेखर कपूर, आनंद एल राय, उदित नारायण, साशा तिरुपती, जोनिता गांधी, अरमान मलिक, अब्दू रोझाक इ. मान्यवरांची उपस्थिती होती.

यावर्षी जानेवारी महिन्यात खतिजा आणि रियासदीन यांनी साखरपुडा केला होता, ५ मे रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. खतिजा ही देखील गायिका असून रियासदिन साउंड इंजिनिअर आहे. त्यांच्या लग्नासाठी कुटुंब आणि मित्रपरिवारातील जवळच्या व्यक्ती उपस्थित होत्या. एआर रहमानने लेकीच्या लग्नातील स्पेशल व्हिडिओ देखील त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.