नवी दिल्ली: Offer On Redmi 10 Smartphone: भारतीय बाजारात कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. रेडमीच्या बेस्टसेलर स्मार्टफोनला तुम्ही खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. ई-कॉमर्स साइट Flipkart वर Redmi 10 स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून या नवीन फोनला १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. Flipkart Sale मध्ये स्वस्तात मिळणाऱ्या Redmi 10 Smartphone वरील ऑफर्सविषयी जाणून घेऊया.

वाचा: ‘या’ रिचार्ज प्लानमध्ये मिळेल तब्बल १०००GB डेटा आणि १ वर्षाची व्हॅलिडिटी, पाहा किंमत

Redmi 10 स्मार्टफोनवरील ऑफर

Redmi 10 स्मार्टफोन फ्लिपकार्टवर खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत १४,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही २६ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १०,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. फोनला ७५० रुपयात खरेदी करण्यासाठी एक्सचेंज ऑफरचा फायदा घ्यावा लागेल. या फोनवर १०,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. परंतु, ही ऑफर जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास रेडमीचा हा फोन ७५० रुपयात तुमचा होईल.

वाचा: ३ ऑगस्टला भारतात एंट्री करणार OnePlus चा सर्वात धमाकेदार स्मार्टफोन; लाँचआधी फीचर्स आले समोर

Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स-

Redmi 10 स्मार्टफोनचे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. या व्हेरिएंटची मूळ किंमत १६,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank Card ने पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. यावर १वर्षाची वॉरंटी देखील दिली जाते. रेडमी १० स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच HD+ Display दिला आहे. यात फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर पॉवरसाठी ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन Qualcomm Snapdragon ६८० Processor सह येतो.

वाचा: १५ हजारांच्या बजेटमध्ये मिळतायत ‘हे’ बेस्ट सेलर ५जी स्मार्टफोन्स, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्तSource link

Leave a Reply

Your email address will not be published.