वाचा: Smartphone Offers: ‘ या’ पॉप्युलर कंपनींच्या स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात, लिस्टमध्ये बजेट ते फ्लॅगशिप फोन्स
iQOO 9T 5G किंमत आणि ऑफर
iQoo 9T 5G च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज स्पेस व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५४,९९९ रुपये आहे. जे ICICI बँक कार्डचा वापर करून स्मार्टफोन खरेदी करतात त्यांना डिव्हाइसच्या खरेदीवर ४,००० रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, ग्राहकांना २,००० रुपयांचे अॅमेझॉन कूपनही दिले जात आहे. Amazon कूपन आणि बँक ऑफरनंतर, iQoo 9T 5G च्या 8GB + 128 GB व्हेरियंटची प्रभावी किंमत ४३,९९९ रुपये असेल आणि 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत ४८,९९९ रुपये असेल.
कंपनी एक्सचेंज बोनस देखील देत आहे. एक्सचेंज ऑफरची निवड करणाऱ्या खरीदारांना जुना नॉन-iQoo फोन एक्स्चेंज करण्यासाठी रुपये ५००० आणि जुन्या iQoo फोनची देवाणघेवाण करण्यासाठी रुपये ७००० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. याव्यतिरिक्त, कंपनी डिव्हाइसच्या खरेदीवर १२ महिन्यांपर्यंतची नो-कॉस्ट ईएमआय देखील ऑफर करत आहे. जर तुम्हाला फोनवर ICICI बँक कार्ड, Amazon कूपन आणि ७,००० रुपयांचा फुल एक्सचेंज बोनस मिळत असेल, तर फोन मोठ्या ऑफसह खरेदी करता येईल.
iQoo 9T 5G मध्ये HD+ Xensation Alpha E5 AMOLED डिस्प्ले, १२० Hz स्क्रीन रिफ्रेश रेट, ३६० Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. हे Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह 12GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज स्पेससह सुसज्ज आहे.