नवी दिल्ली: Airtel OTT Plans:सध्या OTT सर्वात ट्रेंडमध्ये आहे. यामुळेच त्यांच्या सब्सक्रिप्शन कॉस्टमध्ये देखील वाढ झाली आहे. तुम्हीही OTT फॅन असाल, OTT वर आवडते शोज मुव्हीज पाहायला आवडत असेल तर, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हाला या प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळविता येणार आहे . कारण, आता तुम्हाला OTT चे वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज भासणार नाही. अनेक नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्या OTT चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच ऑफरबद्दल सांगणार आहोत.

वाचा: ४८ MP कॅमेरासह पॅक्ड Samsung Galaxy F22 ची किंमत झाली कमी, बजेट सेगमेंटमध्ये आहे बेस्ट पर्याय

Airtel ४९९ पोस्टपेड प्लानमध्ये अनेक ऑफर:

यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला यामध्ये १०० SMS / दिवस देखील मिळतात. या प्लानची विशेषता म्हणजे यामध्ये तुम्हाला Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळते. तसेच, यामध्ये तुम्हाला ७५ GB रोलओव्हर डेटा देखील दिला जातो. एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप, हँडसेट प्रोटेक्शन देखील यामध्ये देण्यात आले आहे.

वाचा: Hacking: तुम्हाला आलेला SMS फेक तर नाही ? ‘असे’ करा माहित, या टिप्स करतील मदत, टाळता येईल नुकसान

Airtel चा ९९९ पोस्टपेड प्लान :

एअरटेल ९९९ पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. फ्री बद्दल सांगायचे तर, हा प्लान तुम्हाला १०० SMS / दिवसाची सुविधा देखील देतो. याशिवाय, Amazon Prime सोबत, तुम्हाला Diney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. जर तुम्ही असा प्लान शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप देखील मोफत मिळू शकेल, तर हा प्लान तुमच्यासाठी योग्य आहे.

Airtel चा: ११९९ चा पोस्टपेड प्लान:

एअरटेलचा हा प्लान सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लानच्या यादीत समाविष्ट आहे. कारण, यामध्ये नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शनही युजर्सना पूर्णपणे मोफत दिले जाते. यामध्ये १५० GB डेटा रोलओव्हर व्यतिरिक्त Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. तसेच, यामध्ये तुम्हाला आधीच अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. म्हणजेच, या प्लानमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्ससाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही. हे या प्लानचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

वाचा: Smart TV Discount : अवघ्या ५ हजारात घरी न्या ४० इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीवी, खरेदीसाठी होतेय ग्राहकांची गर्दीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.