नव्याने आई-बाबा झालेले दाम्पत्य आपल्या बाळाच्या प्रत्येक गोष्टीकडे कधी कुतूहल तर कधी चिंतेने पाहत असतात. लहान मुलाच्या वेगवेगळ्या लिला पाहून पालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक देखील पाहायला मिळते. पालक आपल्या बाळाची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. बाळाच्या एका स्माइलने पालक खूष होतात. पण बाळ कधी कधी एकाच ठिकाणी किंवा एकाच व्यक्तीकडे एकटक बघत बसतात, या प्रश्नाने मात्र ते हैराण होतात.

लहान बाळ कधी एकाठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मान हलवतो तेव्हा ही अतिशय सामान्य गोष्ट असते. परंतु जेव्हा तो जवळच्या सगळ्या गोष्टी सोडून दुसऱ्याच गोष्टीकडे एकटक बघत बसतो. तेव्हा मात्र पालकांना बाळाच्या या वागण्याची चिंता वाटते. या लेखात आपण बाळ एकाच गोष्टीकडे किंवा एकाच व्यक्तीकडे एकटक का बघत बसतो याबद्दल जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​लहान मुलांची नजर समजून घ्या

लहान मुलाची एकटक बघण्याची सवय जाणून घेण्याआधी त्याचं नजर समजून घ्या. लहान मुलं प्रकाशाच्याबाबत अतिशय संवेदनशील असतात. लहान मुलाच्या डोळ्यांच्या बुबुळावर प्रकाश पडल्यास त्याचा आकार लहान होतो. लहान मुलाला लांबच फार दिसत नाही. त्याला जवळची वस्तू किंवा व्यक्ती अधिक स्पष्ट दिसते. कारण लहान मुलाची मध्य नजर ही अजून विकसित होत असते.

(वाचा – Breastfeeding With Flat Nipples : फ्लॅट निप्पल असलेल्या महिलांनी ब्रेस्ट फिडिंग करताना कोणती काळजी घ्यावी))

​बाळ, एकटक का बघत बसतं

एकदा तुम्हाला तुमच्या बाळाची दृष्टी समजली की, बाळ वस्तू किंवा लोकांकडे का पाहत असतात हे तुम्हाला कळेल. बाळाची दृष्टी अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे, ते चमकदार वस्तूंशी, हलणाऱ्या किंवा विरोधाभासी रंगांशी जास्त जोडलेले असतात. म्हणूनच मुले रंगीबेरंगी वस्तू किंवा फिरत्या पंख्याकडे पाहतात. तसेच एखादी व्यक्ती बोलताना सतत इकडे तिकडे फिरत असेल तर बाळ त्यांच्याकडे देखील एकटक पाहत असतं.

(वाचा – गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या ‘मॉर्निंग रूटीनचे’ फॅन आहेत भारतीय पालक, सक्सेस मंत्रामुळे मुलं होणार कायम यशस्वीच..!))

​​लहान मुलांच्या डोळ्याचा विकास कसा होतो

दोन महिन्यांचे बाळ डोळे फिरवू लागते. तीन महिन्यांत, तो 8 ते 12 इंच दूर असलेल्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करू शकतो. पाच महिन्यांच्या बाळाला समजू लागते की, एखादी गोष्ट त्याच्यापासून किती दूर आहे.

(वाचा – Twins Surprising Facts : तुम्हाला देखील जुळी व्हावीत असं वाटतं? तर मग जुळ्या प्रेग्नेसीबद्दल जाणून घ्या ‘या’ सरप्राईजिंग गोष्टी))

​बाळाच्या डोळ्यांची डेव्हलपमेंट

6 किंवा 8 आठवड्यांत, दृष्टी पूर्वीपेक्षा चांगली होते. यावेळी मुलं चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करू लागतात आणि निर्जीव वस्तूंकडून माणसांकडे पाहण्याची त्यांची पसंती अधिक असते.

(वाचा – When baby recognize fathers : कितव्या आठवड्यात तुमचं बाळ तुम्हाला ओळखायला लागतं, एक्सपर्टकडून जाणून घ्या प्रोसेस))

​एखाद्या व्यक्तीला लहान मुलं का एकटक बघतात

काही लोकांना मुलाचा चेहरा आवडतो आणि ते त्यांच्याशी सतत संवाद किंवा खेळत राहतात. त्यामुळे मुलं देखील त्यांच्याकडे टक लावून पाहते. चिमुकलं बाळ कधी तुमचे दागिने किंवा चष्मा किंवा इतर काहीही मनोरंजक वाटेल. बाळाला आकर्षक चेहरे आवडतात म्हणून तो तुमच्याकडे टक लावून पाहतो.

(Nipple Discharge Without Pregnant : गर्भवती नसतानाही निप्पलमध्ये स्त्राव येतोय? हे वंधत्वाचं तर लक्षण नाही ना, जाणून घ्या))

वस्तूंना का एकटक बघत बसतं मुलं?

मुलांना हलत्या गोष्टी आवडतात. त्याला रंगीबेरंगी वस्तू बघण्यातही मजा येते. जेव्हा लहान मूल काहीतरी नवीन किंवा वेगळे पाहते तेव्हा त्याला ते देखील आवडते, ज्यामुळे तो वस्तूंकडे टक लावून पाहू लागतो.

(वाचा -Dengue Scare : गरोदर महिलांना डेंग्यूची लागण झाल्यास काय कराल? लक्षणे, उपाय आणि संपूर्ण गाइड लाइन)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.