नवी दिल्ली:iQOO 9T Launched: आपल्या डिझाइनमुळे लोकप्रिय झालेला iQOO 9T स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. कंपनीने या स्मार्टफोनला दमदार फीचर्ससह लाँच केले आहे. iQOO 9T स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा फ्लॅगशिप प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ प्रोसेसर दिला आहे. या प्रोसेसरसह लाँच झालेला हा भारतातील पहिला फोन आहे. याशिवाय, फोनमध्ये व्ही१+ चिप दिली आहे, जी एक डिस्प्ले चिप इंस्ट्रूमेंटल आहे. यामुळे गेमिंग व फोटोग्राफी दरम्यान शानदार एक्सपीरियन्स मिळेल. या फोनची किंमत ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये आहे. iQOO 9T स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: सोशल मीडिया वापरताना करू नका ‘हे’ काम, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

iQOO 9T ची किंमत आणि ऑफर्स

  • iQOO 9T च्या ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. तर १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ५४,९९९ रुपये आहे.
  • ICICI बँकेच्या कार्डचा वापर केल्यास फोनवर ४ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे ८ जीबी व्हेरिएंट ४५,९९९ रुपये आणि १२ जीबी व्हेरिएंट ५०,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
  • फोनचा पहिला सेल ४ ऑगस्टला दुपारी १२ वाजता Amazon वर सुरू होईल. फोनला iQOO स्टोर वरून देखील खरेदी करू शकता. फोन दोन वेगवेगळ्या रंगात येतो.

वाचा: तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लवकर संपते? या सोप्या टिप्स येतील खूपच उपयोगी

iQOO 9T चे स्पेसिफिकेशन्स

iQOO 9T मध्ये ६.७८ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट ३६० हर्ट्ज आहे. फोनच्या स्क्रीनच्या खालील बाजूला सुपरसोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८+ झेन १ प्रोसेसरसह १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. या डिव्हाइसमध्ये १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४७०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड १२ आधारित ओएसवर काम करतो. यात फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला असून, यामध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, १३ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि १२ मेगापिक्सल पोर्ट्रेट सेंसरचा समावेश आहे. हा कॅमेरा सेटअप सॅमसंग जीएन५ सेंसर आणि OIS सह येतो. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचा: संपूर्ण ३० दिवसांच्या वैधतेसह येतात Jio ‘हे’ रिचार्ज प्लान्स, फ्री कॉलिंगसह मिळेल भरपूर डेटाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.