ncb will destroy 30 thousand kg of drugs: देशातील चार ठिकाणी आज अंमली पदार्थ जाळण्यात येणार आहेत. एनसीबीच्या पथकांकडून ३० हजार किलोग्रॅम इतके अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत. मादक पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चंदिगढला असतील.

 

amit shah drugs
अमित शाहांच्या उपस्थितीत अंमली पदार्थ नष्ट करण्यात येणार
नवी दिल्ली: देशातील चार ठिकाणी आज अंमली पदार्थ जाळण्यात येणार आहेत. एनसीबीच्या पथकांकडून ३० हजार किलोग्रॅम इतके अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत. मादक पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चंदिगढला असतील. या संमेलनादरम्यान दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकात्यात एनसीबीची पथकं ३० हजार किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करतील. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शाह अंमली पदार्थ नष्ट होताना पाहतील.

अंमली पदार्थांविरोधात एनसीबीनं १ जूनपासून धडक कारवाई सुरू केली. एनसीबीनं २९ जुलैपर्यंत ११ राज्यांमध्ये ५१,२१७ किलोपेक्षा अधिक अमली पदार्थ जप्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एनसीबीनं ७५ हजार किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्याचा संकल्प केला आहे.
शाब्बास मुंबई पोलीस! रुम सर्व्हिस बॉय बनून गेले अन् नर्सचे प्राण वाचले; आत्महत्या टळली
आज ३०,४६८ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्यात येतील. त्यामुळे एनसीबी आपलं लक्ष्य ओलांडेल. अंमली पदार्थमुक्त भारताच्या वाटचालीत हे महत्त्वाचं पाऊल असेल. केंद्रीय मंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित असतील. त्यांच्यासोबत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि अंमली पदार्थविरोधी यंत्रणांचे अधिकारीदेखील हजर असतील.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL NetworkSource link

Leave a Reply

Your email address will not be published.