मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे दर-निर्धारण पॅनेल पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत प्रमुख रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ करणार असल्याची माहिती एका अमेरिकन ब्रोकरेजने उघड केली. रेपो दरात वाढ झाल्याने धोरणात्मक भूमिका जाणीवपूर्वक कडक केली जाऊ शकते. एमपीसीच्या बैठकीपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. समितीची बैठक ३ ऑगस्टपासून सुरू होणार असून ५ ऑगस्ट रोजी पतधोरणाचा आढावा सादर केला जाणार आहे.

महागाई नियंत्रणात आणण्याचे आव्हान
वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे आणि जूनमध्ये धोरणात्मक दरात एकूण ०.९५ टक्क्यांनी वाढ केली होती. किरकोळ महागाई मध्यवर्ती बँकेच्या दोन ते सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या बाहेर गेली आहे.

वाचा – US फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराचा ‘चौकार’, भारतासाठी वाजली धोक्याची घंटा

ईएमआयचं ओझं आणखी वाढणार
एप्रिलच्या पतधोरण आढाव्याचा संदर्भ देत ब्रोकरेज कंपनीने सांगितले की, मध्यवर्ती बँकेने पॉलिसी दरात १.३० टक्क्यांनी प्रभावीपणे वाढ केली आहे. त्यावेळी सर्वोच्च बँकेने कायमस्वरूपी ठेव सुविधा सुरू केली होती. अहवालानुसार, चलनविषयक धोरण समिती रेपो दर ०.३५ टक्क्यांनी वाढून ५.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे प्री-कोविड पातळीपेक्षा जास्त आहे.

वाचा – RBI मध्ये पडून राहिलेले ४८ हजार कोटी तुमचे तर नाही; वाचून पाहा कसा करू शकता दावा

जीडीपी किती राहील?
चालनविजयी धोरण बैठकीत MPC २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ग्राहक किंमत निर्देशांक-आधारित महागाई आणि वास्तविक जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) वाढीचा अंदाज अनुक्रमे ६.७ टक्के आणि ७.२ टक्के राखू शकेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.