हे वाचा-शिल्पाचे फोन उचलायचा नाही दीपेश भान, शेवटपर्यंत राहिला अबोला
गोंडस मुलगा साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे एहसास चन्ना (Ahsaas Channa Birthday) . एहसास आज २२ वा वाढदिवस साजरा करत आहे. एवढ्या कमी वयात तिने मनोरंजन विश्वात मोठे नाव कमावले आहे. हॉस्टेल डेझ, कोटा फॅक्टरी, गर्ल्स हॉस्टेल, मॉडर्न लव्ह या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये एहसासने उत्तम काम केले आहे. याशिवाय टीव्हीएफ Girliyappa च्या विविध व्हिडिओंमध्ये ती पाहायला मिळते. एहसासचे अनेक व्हिडिओ युट्यूब तसंच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झालेले पाहायला मिळतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून एहसासने काम करण्यास सुरुवात केली होती. तिने ‘वास्तू शास्त्र’ या सिनेमान रोहन नावाच्या मुलाची भूमिका केली होती. हा एक हॉरर ड्रामा होता, ज्यात सुष्मिता सेनसह तिने स्क्रिन शेअर केली होती. एवढ्या कमी वयातच एहसासने तिच्या अभिनयाची छाप सोडली होती.
हे वाचा-शरद पवारांवरील वक्तव्य अन् शिवप्रेमींवर टीका; केतकीची वादग्रस्त विधानं पुन्हा चर्चेत
मात्र एहसासला बालकलाकार म्हणून खरी ओळख ‘माय फ्रेंड गणेशा’मधील आशू या भूमिकेने दिली. आजही बच्चेकंपनी तिचा हा सिनेम आवडीने बघते. त्यानंतर एहसासने बॉलिवूडचा किंगखान शाहरुखच्या मुलाची भूमिका केली. कभी अलविदा ना कहना मधील तिच्या भूमिकेचं नाव अर्जुन असं होतं.
एहसास ७ वर्षांची झाल्यानंतर तिच्या आईने नकार दिल्याने तिने मुलांच्या भूमिका केल्या नाहीत. ‘कसम से’ या मालिकेत तिने मुलीचीच भूमिका साकारली होती. यानंतर तिने टीव्हीवर बरेच काम केले. ‘देवों के देव महादेव’मध्ये ती भगवान शंकरांची मुलगी अशोक सुंदरीच्या भूमिकेत दिसली होती. तिने मधुबाला, क्राइम पेट्रोल, गंगा, कोड रेड- तलाश इ. टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.
हे वाचा-कसं आहे आमिर खानचं रिना आणि किरणबरोबरचं नातं, उलगडली गुपितं
टीवीएफ गर्लियापाच्या ‘द पीरियड साँग’मधून तिने डिजिटल जगतात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. आज विविध लोकप्रिय डिजिटल शोमध्ये एहसासचा अभिनय पाहायला मिळतो आहे.