मुंबई : कमल हासन यांच्या ‘विक्रम’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाल आहे. या सिनेमातील कमल हासन यांचा लुक आणि त्यांच्या कामाचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत. या सिनेमाचं कथानक, विजय सेतुपती आणि फहाद फासिल यांची कामदेखील प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. या सिनेमामुळे पुन्हा एकदा कमल हासन यांची भुरळ प्रेक्षकांना पडली.

पुणेकरांची कॉलर टाईट! शाहरुखच्या सिनेमात दिसणार पुणे मेट्रो

वास्तविक विक्रम सिनेमा प्रदर्शित होऊन अवघे पाच दिवस झाले आहे. परंतु बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं घसघशीत कमाई केली आहे. लोकेश कनगराज यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात कमल यांच्यासोबत विजय सेतुपती, फहाद फासिलसह सुपरस्टार सूर्या यानं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा सुपर हिट ठरल्यामुळे कमल हासन खूपच आनंदित झालेत. यामुळेच कमल यांनी सिनेमाच्या दिग्दर्शकासह सहकलाकारांना महागड्या भेटवस्तू दिल्या.


कमल हासन यांच्या विक्रम या सिनेमा सुपरस्टार सूर्या यानं अवघ्या ५ मिनिटांची पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. परंतु त्या भूमिकेतही त्यानं छाप उमटवली. सिनेमाला मिळालेल्या यशानं आनंदित झालेल्या कमल हासन यांनी सूर्याला महागडं घड्याळ भेट म्हणून दिलं. याची माहिती खुद्द सूर्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करून दिली. हे फोटो शेअर करत त्यानं पोस्टही लिहिली. त्या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं की, ‘असे क्षण आयुष्याला समृद्ध आणि आनंदित करतात. अण्णा तुम्ही दिलेल्या रोलैक्स घड्याळासाठी खूप खूप आभार.’ सूर्यानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये कमल हासन त्याच्या हातावर घड्याळ लावताना दिसत आहे.

सोनेरी आणि पांढरी रंगसंगती असलेल्या रोलैक्स घड्याळ्याची किंमत सुमारे ४७ लाख रुपये इतकी आहे. दरम्यान, कमल यांनी या सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना लेक्सस ही गाडी भेट म्हणून दिली. विक्रम सिनेमानं जगभरात २०० कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.

‘रानबाजार’ सीरिजचे शेवटचे दोन भाग येणार या तारखेला

कमल हासन यांनी सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल एक व्हिडिओ शेअर करत आभार मानले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणाऱ्या सूर्याचे खास आभार मानले आहेत. तसंच विक्रमच्या पुढच्या फ्रेंचाईजीमध्ये सूर्याची भूमिका मोठी असेल, असे आश्वासनही दिलं आहे.

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हिरोची कहाणी प्रेक्षकांना कशी वाटली?

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.