भारताला प्रेरणादायी स्त्रियांचा एक मोठा इतिहास आहे. ज्यांचे विचार नेहमीच समस्त स्त्री वर्गासाठी खूप जास्त आशावादी ठरतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सुधा मूर्ती (Sudha murthy) होय. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (narayan murthy) यांच्या सुधा मूर्ती या पत्नी, पण त्यांची ओळख तेवढीच नसून एक प्रेरणादायी वक्त्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची भाषणे, त्यांची पुस्तके यांना प्रचंड मागणी आहे. त्यांचे विचार असे आहेत जे नेहमी ऐकत रहावेसे वाटतात. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची आज करोडोंची संपत्ती आहे.

पण जर तुम्ही त्यांची आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची लाईफस्टाईल पाहिली तर विश्वास बसणार नाही एवढे सामान्य जीवन ते जगतात. श्रीमंत असून सुद्धा साधेपणात समाधानी जीवन कसे जगावे यावर आपले अमुल्य विचार सुधा मूर्ती नेहमी लोकांसमोर मांडत असतात आणि त्यांना प्रेरणा व सक्सेस मंत्र देत असतात, पण त्या शिवाय स्त्रियांना सतत त्या आपल्या शब्दांवाटे बळ देत असतात आणि त्यांचे हे विचार प्रत्येक स्त्रीने आत्मसात करावे असे असतात.

योग्य गोष्टीसाठी आवाज उठवा

सुधा मूर्ती पहिल्यापासूनच निडर आहेत. त्यांच्या मते जे योग्य आहे त्यासाठी उभे राहणे आणि स्वत:चा आवाज हक्काने मांडणे यात काहीच गैर नाही. त्यांचा असाच एक किस्सा आहे. त्या TELCO कंपनीमध्ये एका पोस्टसाठी जॉब अप्लाय करायला गेल्या तेव्हा त्यांना कळले की त्या पोस्टसाठी फक्त पुरूष अप्लाय करू शकतात आणि स्त्रियांना अप्लाय करायचा अधिकाच नाही. तेव्हा त्यांना या भेदभावाविरोधात आवाज उठवला आणि टाटा सारख्या ब्रँडशी त्या नडल्या. त्यांनी थेट जे,आर.डी. टाटा यांना पत्र लिहिले होते आणि लिंगभेद विरोधात आवाज उठवला. अखेर टाटांनी त्यांना बोलावले आणि जॉब दिला. तेव्हा सुधा मूर्ती भारतातील पहिल्या महिला इंजिनिअर ठरल्या. त्यांच्या या उदाहरणावरून त्या नेहमी सांगतात स्त्रियांनीच नाही तर प्रत्येक व्यक्तीने आपला हक्क कधीच सोडू नये आणि त्यासाठी वेळ पडल्यास आवाजही उठवावा.

(वाचा :- माझी कहाणी : मी एका अनोळखी मुलीला एक रात्र घरात राहून दिलं, त्या एका रात्रीत असं काही घडलं की माझं आयुष्यच पूर्ण बदलून गेलं)

प्रामाणिक राहा

कितीही यश मिळाले तरी हुरळून न जाता जमिनीवरच राहावे आणि आपण ज्या मातीमधून आलो त्या मातीशी नेहमी प्रामाणिक राहावे असा सल्ला सुधा मूर्ती आजच्या तरूणी व तरूणांना देतात. त्या स्वत: एवढ्या श्रीमंत आहेत की आज ऐशोआरामात जीवन जगू शकतात. पण त्या खूप म्हणजे खूप साधं आयुष्य जगतात. त्यांच्या मते त्यांनी इथवर पोहोचण्यासाठी एक संघर्ष केला आहे आणि तो संघर्ष त्यांना सतत आठवून देतो की त्या कुठून आल्या आहेत. त्यामुळे आपल्या मेहनतीशी आणि यशाशी सदा प्रामाणिक राहावे असा सल्ला त्या देतात.

(वाचा :- माझी कहाणी : मी 12 वी मध्ये शिकणारी मुलगी असून माझ्यावर एक अत्यंत वाईट प्रसंग बेतला आहे, असं कोणासोबतच घडू नये)

सतत शिकत राहा

याशिवाय सुधा मूर्ती अजून एक महत्त्वाचा सल्ला सर्व लोकांना देतात की, कोणतीही गोष्ट शिकण्याचे विशिष्ट वय नसते. त्यामुळे कधीही नवनवीन गोष्टी शिकणे सोडू नका, खास व वेगळ्या गोष्टी शिकत राहा. कम्फर्ट झोनमध्ये एकदा अडकलात की तुमची प्रगती संपली समजा असे त्या स्पष्ट म्हणतात. रोज नवनवीन गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि समजून घेतल्या पाहिजेत. जगासोबत आपण पुढे जायला पाहिजे यामुळे आपल्यातही एक वेगळी उर्जा संचारते असा संदेश त्या देतात. यामुळे माणूस मेंदूने आणि मनाने खूप तरूण राहतो व समाधानी आयुष्य जगतो असे त्या आपल्या अनुभवावरून सांगतात.

(वाचा :- माझी कहाणी : आई-वडिलांना माझं लग्न होऊन द्यायचं नाहीये, दोघांनी मला मारून टाकण्याची धमकीही दिली आहे, काय करू..!)

पैशांबाबत अनोखे मत

सुधा मूर्ती हा खास सल्ला आई असलेल्या स्त्रियांना देतात. त्यांच्या मते पैसा ही अशी गोष्ट आहे ज्याचा खूप आदर केला पाहिजे, नाहीतर हाच पैसा एक दिवस तुमच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरेल.सुधा मूर्ती सांगतात की आपल्या मुलांना पैश्याची शिस्त लावा. ज्या मुलांना पैश्याची शिस्त लागेल ती मुले आयुष्यात कधीच मागे राहणार नाहीत. त्यांनी केवळ ही गोष्ट जगाला सांगितली नाही तर आपल्या मुलांना सुद्धा शिकवली आणि म्हणूनच आजही ती सर्व मुले स्वत:च्या कर्तुत्वावर नाव कमावून आहेत. आपल्या श्रीमंतीचा त्यांना जराही गर्व नाही हे विशेष! आजच्या काळात पैसा हेच सर्वस्व मानले जाते यात शंका नाही. म्हणूनच लोक आयुष्यात नात्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतात. मात्र, सुधा मूर्ती यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मुलांना शिकवले पाहिजे की पैशाने माणूस असाधारण होत नाही’ किंवा सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी पैसा नाही तर कर्म महत्त्वाचे असतात.

(वाचा :- माझी कहाणी : मला एक गंभीर आजार झाला आहे, जी गोष्ट मी नवरा व सासरच्या मंडळींपासून लपवली आहे, पण आता मला भीती वाटतीये)

जशा आहात तशाच राहा

सुधा मूर्ती म्हणतात की, “कधीच स्वत:ला इतरांसाठी बदलू नका.” जशा आहात तशाच राहा. केवळ दुसरा एखादा व्यक्ती म्हणतो किंवा केवळ दुसऱ्याला दाखवण्यासाठी तुम्ही स्वत:ला बदलत असला तर यापेक्षा मोठी चूक नाही असे सुधा मूर्ती स्पष्ट सांगतात. यामुळे फायदा काही होत नाही पण कधीकधी आपलेच हसे होते. त्यामुळे प्रगती करा, आयुष्यात खूप पुढे जा. पण आहात तशाच रहा. तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखाने जगल्याचे समाधान मिळेल.

(वाचा :- केक आणायला बेकरीत गेली व तिथे बसलेल्या अनोळखी मुलाला प्रपोज केलं, मग पुढे..! कहाणी ऐकून म्हणाल, ‘असंही प्रेम होतं..?’)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.