नवी दिल्ली: केंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्यांसाठी दुसरा डोस आणि बुस्टर डोसच्या दरम्यानचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तशी घोषणा केली आहे.

परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बुस्टर डोसमध्ये सरकराने सलवत देण्याचा निर्णय घेतला आहे. NTAGIने केलेल्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर ९ महिन्याहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत कमी करण्यात आले आहे.

वाचा- पंतप्रधान मोदी श्रीनगरला का जात नाहीत?; काश्मीरी पंडिताच्या हत्येवर भाजप नेत्याचा सवाल

सरकारच्या सल्लागार समितीने शिफारस केली होती की, जे लोक परदेशात प्रवास करणार आहेत, ते ९ महिन्याच्या सक्तीच्या कालावधीच्या आधी ज्या देशात जाणार आहेत तेथील आवश्यकतेनुसार करोना लसीचा बुस्टर डोस घेऊ शकता. आतापर्यंत १८ वर्षावरील ज्यांनी ज्यांनी करोनाची दुसरी लस घेऊन ९ महिने पूर्ण केले आहेत ते सर्वजण बुस्टर डोस घेऊ शकतात. हा कालावधी आता ३ महिने म्हणजेच ९० दिवसांचा करण्यात आलाय.

वाचा- दोनदा पंतप्रधान झालात आता पुढे काय?; नरेंद्र मोदींनी दिलं भन्नाट उत्तर

देशातील अनेक राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले होते. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कायम आहे. जर राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्या वाढली तर आपण योग्य काळजी घेऊ, असेहे ते म्हणाले.

वाचा- भारताची ताकद आणखी वाढणार; चीन, पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या ब्रह्मोसची..Source link

Leave a Reply

Your email address will not be published.