ज्या रुग्ण लक्षणे दिसताच वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाले त्यांचे प्रमाण ३५ टक्के होते. ४३ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची अतिशय कमी गरज भासली, त्यांना एका आठवड्याच्या आत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या रुग्णांवर मोनोक्लोनल अॅण्टिबॉडी कॉकटेल थेरपी, टोसिलिझूमॅब किंवा रेमडिसिव्हीरसारखे वैद्यकीय उपचार करण्यात आले.
रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या एकूण रुग्णांपैकी ३७,२६८ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले, तर ४६३७ म्हणजे १०.९ टक्के रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. ७७७ रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले. हे प्रमाण अत्यल्प म्हणजे १.८ टक्के होते. करोनामुळे झालेले मृत्यू ६६ टक्के तर, करोनाव्यतिरिक्त आजारामुळे १६ टक्के रुग्णांना प्राण गमवावे लागले असे या अभ्यासात दिसून आले आहे. वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी २३ टक्के रुग्ण अत्यवस्थ होते. तर, ७४ टक्के रुग्णांना मध्यम ते तीव्र स्वरूपाची करोनाची लक्षणे होती. चार टक्के रुग्णांची प्रकृती स्थिर होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २३ टक्के रुग्णांना लक्षणांची तीव्रता वाढल्यामुळे अतिदक्षता विभागामध्ये न्यावे लागले, तर ६६ टक्के रुग्ण हे वॉर्डमध्ये होते. ११ टक्के करोनाबाधित हे एचडीयू विभागामध्ये उपचार घेत होते.
कालावधी रुग्ण प्रमाण टक्क्यात
१ ते ७ दिवस १४९८१ ३५.१
१५ ते ३० दिवस ७९२६ १८.६
३१ ते ६० दिवस ११०४ २.६
६१ ते ९० दिवस २३१ ०.५
८ ते १४ दिवस १८२९५ ४२.९
९० दिवसापेक्षा अधिक १४५ ०.३