विशाखपट्टणम : भारतासाठी तिसरा ट्वेन्टी-२० सामना हा करो या मरो असाच असणार आहे. कारण हा सामना गमावल्यावर भारतीय संघाला ही मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

भारतीय संघात कोणत्या दोन खेळाडूंना संधी मिळणार, जाणून घ्या…
भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल हा महागडा ठरलेला आहे, त्याचबरोबर त्याला फलंदाजीमध्येही विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याला डच्चू मिळू शकतो, असे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघात हा पहिला बदल पाहायला मिळेल. पण अक्षरच्या जागी संघात कोणाला स्थान द्यायचे, हा मोठा प्रश्न भारताच्या संघापुढे असेल. कारण जर अक्षरच्या बदली एका फिरकीपटूला संघात स्थान द्यायचे असेल तर रवी बिश्नोई हा सर्वांत चांगला पर्याय संघापुढे असेल. पण जर भारताला अजून संघ बळकट करायचा असेल तर ते दीपक हुडासारख्या अष्टपैलू खेळाडूला संधी देऊ शकतात. त्यामुळे अक्षरच्या जागी भारतीय संघात रवीला संधी मिळते की हुडाला याची उत्सुकता सर्वांना असेल.

भारताच्या संघात अजून एक मोठा बदल हा वेगवान गोलंदाजीमध्ये होऊ शकतो. कारण या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरण असेल. त्यामुळे या सामन्यात उमरान मलिकला संधी देण्यात येईल, असे दिसत आहे. पण जर उमरानला संधी द्यायची असेल तर कोणत्या वेगवान गोलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवायचा, याचे उत्तर निवड समितीला ठरवावे लागणार आहे. भारताकडे यावेळी हर्षल पटेल आणि अवेश खान असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोघांपैकी कोणाला संघाबाहेर केले जाते, हे पाहावे लागेल.

भारताचा संभाव्या संघ :
ऋषभ पंत (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.