बंगळुरु : राज्यसभेच्या ५७ जागांसाठीची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्यसभेच्या ५७ जागांपैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील १६ जागांसाठी निवडणूक पार पडतेय. महाराष्ट्रातील मतमोजणी अद्याप सुरु झाली नसली तरी राज्यस्थान आणि कर्नाटकमधील मतमोजणी पार पडली आहे. कर्नाटकमध्ये भाजपनं तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे. जेडीएसच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण, जग्गेश आणि लेहर सिंघ सिरोया यांचा विजय झाला आहे. तर, काँग्रेसचे जयराम रमेश विजयी झाले आहेत.

कर्नाटकमध्ये भाजपचे १२१ आमदार असूनदेखील त्यांनी तीन जागांवर उमेदवार दिले होते. काँग्रेसनं ७० आमदार असताना २ उमेदवार दिले होते. तर, जनता दल संयुक्तनं ३२ आमदार असताना १ उमेदवार दिला होता. मात्र, भाजपनं तीन जागांवर विजय मिळवले आहेत तर, काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे.

‘कोल्हापूरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार, कोल्हापूरचाच खासदार होणार.’ संभाजीराजेंचं ट्विट

जयराम रमेश यांनी हा माझा विजय नसून टीम काँग्रेसचा विजय असल्याचं म्हटलं. संपूर्ण काँग्रेस पार्टी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिध्दारामय्या आणि पक्षांच्या प्रतोद आणि सर्व आमदारांचा हा विजय असल्याचं जयराम रमेश म्हणाले. आमचं एक मत देखील अवैध ठरलं नाही. हा सांघिक कृतीचा विजय आहे, असं जयराम रमेश म्हणाले.

मन्सूर अली खान यांचा देखील यामध्ये मोठं योगदान असल्याचं जयराम रमेश म्हणाले. त्यांनी भाजप आणि जेडीएसमधील लिंक समोर आणल्याचं रमेश यांनी म्हटलं. जेडीएस ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप रमेश यांनी केला.

‘तुम्ही म्हणाल तोच नियम काय?’ रवी राणांच्या मतदानावर आक्षेप, नवनीत राणा मुख्यमंत्र्यांवर भडकल्या

गेहलोतांंचं परफेक्ट नियोजन, काँग्रेसची सरशी, ३ जागांवर गुलाल, सुभाष चंद्रांना पराभवाचा धक्का

राज्यस्थानात काँग्रेसला तीन जागांवर यश
राजस्थानमधून काँग्रेससाठी चांगली बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला विजयी झाले आहेत. तर, भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. राजस्थानमध्ये सुभाष चंद्रा यांच्या उमेदवारीमुळं काँग्रेसपुढं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नियोजनामुळं काँग्रेसला विजय मिळाला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.