लंडन: इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG v NZ 2nd Test ) यांच्यात दुसरा कसोटी सामना नॉटिंघम येथे सुरू आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ७ बाद २२४ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात त्यांनी ५५३ धावा केल्या होत्या उत्तरादाखल इंग्लंडने पहिल्या डावात ५३९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडे सध्या २३८ धावांची आघाडी असून सामना ड्रॉ होण्याची शक्यता अधिक वाटते.

दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स एडरसन(James Anderson)ने इतिहास घडवला. चौथ्या दिवशी जेम्सने न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लॅथमला बाद केले आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या ६५० विकेट झाल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला जलद गोलंदाज ठरला आहे. ही जेम्सने ही कामगिरी १७१व्या कसोटीत केली.

वाचा- IND vs SA: तिसरी टी-२० आज; भारताचा पराभव झाल्यास ७ वर्षातील…

३९ वर्षीय जेम्स एडरसन हा तिसरा गोलंदाज आहे ज्यानेन ६५० विकेटचा टप्पा पार केलाय. याआधी श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न यांनी अशी कामगिरी केली आहे. कसोटी मुरलीधरनच्या नावावर सर्वाधिक ८०० विकेट असून त्याने १३३ सामन्यात ही कामगिरी केली आहे. तर शेन वॉर्नने १४५ सामन्यात ७०८ विकेट घेतल्या. एडरसनला वॉर्नला मागे टाकण्याची संधी आहे.

वाचा- सचिन तेंडुलकरला मिळणार ७० हजार पेन्शन; BCCIच्या निर्णयाचा इतक्या जणांना फायदा


वाचा-
असं कुठवर चालणार; रोहित शर्मा नसेल तर तुम्ही जिंकणार नाही का?

एडरसनने २००३ साली झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. करिअरच्या सुरुवातीला फार चांगली कामगिरी त्याला करता आली नाही. पण २००७ नंतर एडरसनचा जलवा सुरू झाला. कसोटीसोबत वनडे देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे. वनडेत १९४ तर टी-२० मध्ये १९ मॅच खेळणाऱ्या एडरसनने अनुक्रमे २६९ आणि १८ विकेट घेतल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.