नव्वदीच्या दशकात आपल्या अभिनयाची जादू सर्वांवर करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या सुंदर डोळ्यांमुळे ओळखली जाते. गेली अनेक वर्ष काजोल तिच्या नजरेने सर्वांना घायाळ करत आहे. जर तुम्हाला सुद्धा काजोलसारखे सुंदर डोळे हवे असतील तर या साध्या टिप्स फॉलो करा.

या टिप्स फॉलो करुन तुम्ही सुंदर डोळे मिळवू शकता. त्याच प्रमाणे डोळ्यांखाली आलेले काळ डाग देखील कमी होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
(फोटो सौजन्या: टाइम्स ऑफ इंडिया)

​डोळ्यांना विश्रांती द्या

जसा चेहरा उजळण्यासाठी विश्रांतीची गरज असते. त्याचप्रमाणे डोळ्यांनाही विश्रांतीची गरज असते. डोळ्यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि त्यांची खोली टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. किमान सात ते आठ तासांच्या झोपेने तुमचे डोळे चमकतील.

(वाचा :- धकधक् गर्ल Madhuri Dixit च्या सौंदर्याचे भारत ते अमेरिका सारेच दिवाने, घायाळ करणा-या सौंदर्यामागील टॉप सीक्रेट उघड..!)

​शिया बटर

शिया बटरने मसाज केल्याने डोळ्यांचे सौंदर्य वाढते. खरे तर केवळ डोळ्यांकडे लक्ष देणे पुरेसे नाही. डोळ्याभोवती लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे डोळ्याभोवती शीया बटरने मसाज करा. शिया बटर पापण्यांवरही लावा. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-ई देखील पापण्या वाढण्यास मदत करतात, ज्यामुळे डोळे अधिक सुंदर दिसतात.

(वाचा :- या ५ सोप्या पद्धतीने कमी करा तुमच्या त्वचेवरील टॅन आणि मिळवा काचेसारखी नितळ त्वचा)

​पेट्रोलियम जेली

पेट्रोलियम जेलीने मसाज केल्याने डोळ्यांचे सौंदर्यही वाढते. डोळ्यांच्या पापण्यांवर अगदी हळूवारपणे लावा. लक्षात ठेवा की ते कोणत्याही परिस्थितीत डोळ्याच्या आत जाऊ नये. ही जेली तुम्ही पापण्यांवरही थोडीशी लावू शकता.

(वाचा :- Kiara Advani : कियाराचे ‘ब्युटी सिक्रेट’ स्वयंपाकघरात ! पार्लर नको घरातच करा हा रामबाण उपाय)

​ग्रीन टी

ग्रीन टी बॅग्ज वापरल्यानंतर त्या फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड करा. थंड चहाच्या पिशव्या डोळ्यांवर ठेवा आणि थोडा वेळ आराम करा. असे केल्याने डोळ्यांसोबतच आसपासच्या त्वचेलाही आराम मिळेल. चहाच्या पिशव्यामुळे तो थकवा दूर होईल आणि फुगलेले डोळे सुंदर दिसू लागतील.

(वाचा :- अवघ्या 10 रुपयांत मिळवा सरळ आणि keratin ट्रीटमेंटप्रमाणे मुलायम केस, घरी करता येईल ही ट्रिक)

​थंड पाणी

डोळ्यांना आराम देण्यासाठी थंड पाणी हा सर्वात खात्रीचा उपाय आहे. डोळ्यांवर थंड पाणी चांगले पसरवा. असे केल्याने डोळ्यांना आराम मिळेल. हे आसपासच्या त्वचेवरील तणाव देखील दूर करेल. (टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.)

(वाचा :- अवघ्या 10 रुपयांत मिळवा सरळ आणि keratin ट्रीटमेंटप्रमाणे मुलायम केस, घरी करता येईल ही ट्रिक)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.