वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2016 मध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे (CVDs) सुमारे 17.9 मिलीयन लोक मरण पावले, जे जगभरातील सर्व जागतिक मृत्यूंपैकी 31% आहे. डब्ल्यूएचओचा (WHO) असं म्हणणं आहे की यापैकी 85% लोकांचा मृत्यू हा हार्ट अटॅक (heart attack) आणि हार्ट स्ट्रोकमुळे (heart stroke) होतो. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराची लक्षणे कोणती? यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला मोठा तणाव किंवा कळ जाणवते जी काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते किंवा ती निघून जाते आणि परत येते.

या बैचेनी किंवा अस्वस्थपणामुळे तुम्हाला दबाव, जडपणा किंवा वेदना जाणवू शकतात. तुम्हाला अशक्तपणा, डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) सूचित करते की हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असू शकतात. पुरुषांमध्ये सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, परंतु स्त्रियांमध्ये इतर सामान्य लक्षणे आहेत. बरं, हृदयविकाराची काही लक्षणे अशी देखील आहेत जी कानामध्ये दिसू शकतात.

कानात दिसतात हार्ट अटॅकची ही लक्षणे

हृदयविकाराच्या झटक्याचे एक विचित्र लक्षण तुमच्या कानात जाणवू शकते, ज्याला ‘फ्रँक्स साइन’ (Frank’s sign) म्हणतात. हे कानाच्या लोबमधील एक क्रीज आहे, जे लोब्यूलच्या पलीकडे ट्रॅगसपासून ऑरिकलच्या मागील काठापर्यंत पसरते. याचे नाव सँडर्स टी या फ्रेंक यांच्या नावावरून ठेवण्यात आले. हो तो व्यक्ती आहे जो छातीत दुखणे आणि कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज असलेल्या रुग्णांमध्ये क्रिझचं निरीक्षण करणारा पहिला व्यक्ती होता. हे कार्डियाक पॅथॉलॉजीशी आणि कोरोनरी आर्टरी एथेरोस्क्लेरोसिसशी संबंधित असल्याचे मानले जाते.

(वाचा :- गुडघेदुखी, थायरॉइड, हार्ट स्ट्रोक, वेटलॉस, पोट साफ होण्यासाठी व वाढतं वय रोखण्यासाठी फक्त रोज प्या हे पाणी…!)

स्टडीतून नेमकं काय आलं समोर?

2016 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार ज्या लोकांच्या कानावर केस आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. विशेषत: अशा लोकांना कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. संशोधनानुसार, तुमचे कान आणि हृदयविकारांचा घनिष्ठ संबंध आहे. 1973 साली डॉ. सँडर्स टी. फ्रँक आणि त्यांच्या टीमला असे आढळून आले की ज्या लोकांच्या कानावर जास्त केस आहेत त्यांना हृदयविकाराची समस्या अधिक आढळून आली. आजच्या काळात कानावर केस येण्याची समस्या जेनेटिकपेक्षा धावपळीच्या जीवनामुळे जास्त आहे. मात्र ही समस्या सर्वाधिक सिगारेट ओढणाऱ्या लोकांमध्ये दिसून येत आहे. तुमच्या कानावर केस असतील तर ही साधी गोष्ट म्हणून दुर्लक्ष करू नका.

(वाचा :- शौचास कडक होणं, पोट साफ न होणं व मुळव्याधाची समस्या झटक्यात होईल दूर, आजच करा आयुर्वेदिक डॉक्टरांचे हे 5 उपाय)

हार्ट अटॅकची इतर कारणे

मेयो क्लिनिकच्या मते, 45 वर्षे व त्याहून अधिक वयाचे पुरुष आणि 55 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या महिलांना हृदयविकाराचा धोका तरुण पुरुष आणि स्त्रियांपेक्षा जास्त असतो. याशिवाय उच्च रक्तदाब (high blood pressure), कोलेस्टेरॉल (cholesterol), लठ्ठपणा (weight gain), मधुमेह (diabetes) आणि मेटाबॉलिक सिंड्रोम (metabolic syndrome) यासारख्या परिस्थिती असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.

(वाचा :- Gut Health Tips : बापरे, तुमच्याच या भयंकर चुकांमुळे आतडी सुकू लागतील व पिळ बसू लागेल, डॉक्टरांचा कडक इशारा.!)

या गोष्टींमुळेही वाढतो धोका

तंबाखूचे सेवन, मद्यपान, बैठी जीवनशैली, ताणतणाव, उलट-सुलट गोष्टींचे सेवन आदींमुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

(वाचा :- आयुष्यभर डायबिटीज होऊ नये व असेल तर वाढू नये म्हणून चुकूनही खाऊ नका ‘हे’ 7 पदार्थ, झपाट्याने वाढेल ब्लड शुगर..)

हार्ट अटॅकपासून बचावाचे मार्ग

हृदयविकाराचा धोका टाळण्याचा किंवा कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे. हलके आणि स्वच्छ जेवण खाणे, नियमित व्यायाम करणे, स्ट्रेस कमी घेणे आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य सांभाळल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्याची शक्यता वाढते.

(वाचा :- Hepatitis A,B,C,D,E काय आहे? लिव्हर खराब करणा-या जीवघेण्या आजाराचा धोका या लोकांना जास्त, डॉक्टरांचा कडक इशारा)

हार्ट अटॅक आल्यावर काय करावं?

यासाठी तुम्ही कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) चा अवलंब करू शकता. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराच्या झटक्याने पीडित व्यक्तीसाठी तातडीने करता येईल अशी सीपीआर ही आपत्कालीन प्रक्रिया आहे. ज्याच 120 च्या स्पीडने रूग्णाच्या ह्रद्यावर प्रेशर दिले जाते. ही प्रक्रिया रक्तप्रवाह सक्रिय ठेवण्यास, हृदयाला ब्लड पंप करण्यास, हृदयाची गती कमी असलेल्या व्यक्तीमधील श्वासोच्छवास आणि हृदयाचे ठोके पूर्ववत करण्यास मदत करते.

(वाचा :- हार्ट फेल, हार्ट अटॅक, रक्ताच्या नसा ब्लॉक करतं कोलेस्ट्रॉल, या 2 भागांत होतात खूप वेदना, लगेच करा ही 4 कामं)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. शिवाय आम्ही या लेखातून कोणताही दावा करत नाही आहोत. त्यामुळे स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी. काही प्रश्न असल्यास आणि अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. महाराष्ट्र टाइम्स कोणत्याही दाव्यास जबाबदार राहणार नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.