गोंदिया : गोंदियामध्ये रस्ते अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. इथे कारवरील ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खोबा गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात चार तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून हे चारही तरुण गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील आहेत. आंमगाव तालुक्यातील पाच तरुण नवेगावबांध येथे सोलर पंप फिटींग करण्यासाठी एका चार चाकी वाहनाने गेले असता सोलर फिटींगचे काम आटोपून हे पाच तरुण रात्री परत येत असताना अचानक गाडी अनियंत्रित झाली.

धक्कादायक! साताऱ्याला जाताना मुंबईच्या व्यापाऱ्याची गाडी अडवली, एकाने पिस्तूल रोखली आणि…
गाडी रस्त्याच्या खाली आपटून चकनाचूर झाली. यात पाच तरुणानं पैकी चार तरुणांचा घटना स्थळी मृत्यू झाला. तर या अपघातात २४ वर्षीय प्रदीप बिसेन हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतकामध्ये २४ वर्षीय रामकृष्ण बिसेन, २४ वर्षीय सचिन कटरे, १८ वर्षीय संदीप सोनवाने, २७ वर्षीय निलेश तुरकर यांचा समावेश आहे.

Monkeypox : सेक्स, मिठी ते किसिंग… मंकीपॉक्स रोखण्यासाठी गाइडलाइन्स जारी, आताच व्हा सावधSource link

Leave a Reply

Your email address will not be published.