भारतातील विवाहासोहळे एखाद्या उत्साहापेक्षा वेगळे नसतात. लग्नामध्ये दोन व्यक्तीच्या एकत्र येणे ही खूप साधी गोष्ट आहे. लग्नामध्ये अनेक जण नवविवाहित जोडप्याला आर्शिवाद देण्यासाठी येतात. असेच लग्न भारतातील श्रीमंत परिवारामध्ये म्हणजेच अंबानी परिवारामध्ये झाले आहे.

नुकतेच आनंद पिरामल यांचा चुलत भाऊ आदित्य शाहने काही दिवसांपूर्वीच त्याची मैत्रीण प्रज्ञा साबूसोबत लग्नगाठ बांधली. या लग्न समारंभाला मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ( isha ambani) यांनी हजेरी दाखवली. यावेळी ईशा अंबानीने कोणतीही कसर सोडली नाही. ईशा अंबानीच्या लूक पाहून अनेक जण घायाळ झाले .
(सर्व फोटो-@_ishaambanipiramal)

​नववधूसारखी दिसत होती ईशा

दिराच्या लग्नामध्ये ईशा अंबानीने पेस्टल कलरचा लेहेंगा परिधान केला होता, जो तिने भारतीय प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्या ‘गुलाबो’ कलेक्शनमधून घेतला होता. या लेहेंग्याला जड पॅनल्ससह सुंदर लूक देण्यात आला होता. हा थ्री पीस लेहंग्याला जुळणारा दुपट्टा आणि ए-लाइन स्कर्ट देण्यात आला होता.

(वाचा :- ब्लॅक डीपनेक ड्रेसआणि शॉर्ट हेअरमध्ये दिशा पटानीचा जलवा, तिच्या बोल्डनेसने सर्वांना केलं क्लिन बोल्ड)

​लेहेंग्यावर बारीक नक्षी

या सुंदर लेहेंग्यावर हाताने नक्षी करण्यात आली आहे. या लेहंग्यावर सोनेरी रंगाची नाजूक नक्षी करण्यात आली होती. तिच्या या लेहेंग्यावरुन सर्वांच्या नजरा हटतच नव्हत्या. यावेळी ईशा नव्या नवरी पेक्षाही सुंदर दिसत होती.

(वाचा :- Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे पेपर प्रिंन्ट साडीमधील फोटो प्रचंड व्हायरल, ‘माळी टाईम्स’ म्हणत फोटो केले शेअर)

​शॉर्ट ब्लाऊज

लेहेंग्याप्रमाणे, त्याच्या ब्लाउजवर मॅचिंग एम्ब्रॉयडरी दिसू शकते. या सुंदर लेहेंग्यावर ईशाने सुंदर भरतकाम केलेली ब्लाऊज परिधान केला आहे. यावर फुलांची आणि पानांच्या रचना करण्यात आले होते. या सोनेरी रंगाच्या नक्षीमुळे ईशा खूप सुंदर दिसत होती. या ब्लाऊजला पारदर्शक हात देण्यात आले होते. त्यामुळे ही चोळी अजूनच सुंदर दिसत होती.

(वाचा :- Mouni roy bold photos : लग्नानंतर पहिल्यांदाच मौनी रॉयने शेअर केले बेडवरील टॉपलेस फोटोज, बिकिनीतील बोल्ड फोटोज प्रचंड व्हायरल)

​तुम्ही ही ट्राय करा हा लूक

ईशाने या सुंदर लेहेंग्यावर हेवी ऑक्सिडाईड ज्वेलरी घातली होती ज्यात तिच्या गळ्यात सोन्याने जडवलेला चोकर नेकपीस, मॅचिंग ड्रॉपडाउन इअरिंग्ज आणि तिच्या डोक्यावर त्याच दागिन्यांशी जुळणारा मांग टिका लावला होता. यावेळी ईशाने दोन्ही हातात सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या. त्यामुळे ईशा फारच सुंदर दिसत होती.

(वाचा :- ”केसरीया इश्क” ! भावी सून राधिका मर्चंटचा अरंगेत्रम सोहळ्यात नीता अंबानीचा रॉयल कारभार, साडी पाहून डोळ्याचे पारणेच फिटेल)

​ईशाचा मेकअप

यावेळी ईशाने आयशॅडो, बेसिक लाइनर, स्मोकी डोळे, गडद लिपस्टिक, बीमिंग हायलाइटर आणि स्लीक मिड-पार्टेड स्टाइलसह न्यूड टोन फाउंडेशन निवडले. तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता. त्यामुळे तुम्हाला ग्लॅमरस लूक मिळू शकतो.

(वाचा – Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा ग्लॅमसर अवतार, ट्यूब ब्लाउज, नथ, आणि काळी साडी नेसून चाहत्यांना केलं घायाळ)

​टिश्यू फॅब्रिकची सुंदरता

सुंदर रंगीत लेहेंगा सिल्क-ऑर्गेन्झा आणि टिश्यू फॅब्रिकमध्ये डिझाइन केले होते, जे हलके आणि आकर्षक पॅटर्नमध्ये होते. या पोशाखावर पारंपारिक नक्षीकाम करण्यात आले होते. संपूर्ण लेहेंगा रेशमी धाग्यांनी बनवलेल्या सुंदर फुलांनी सजलेला होता.

(वाचा :- काळ्या साडीत नीता अंबानींचा ग्लॅमरस अवतार, भाची इशिताच्या लग्नात वेधल्या सर्वांच्या नजरा नुसता ‘शाही थाट’)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.