मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) बॉलिवूडमध्ये आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) साऊथ इंडस्ट्रीमध्ये ‘लायगर’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रमोशन करत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. विजय-अनन्याने लोकलने प्रवास केला, तर विविध ठिकाणी ते भेट देऊन ‘लायगर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान काही ठिकाणी या लाडक्या स्टार्सना पाहण्यासाठी मोठी गर्दी होते आणि ती आटोक्यात आणणं सुरक्षा रक्षकांना अनेकदा कठीण होऊन जातं. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडला आहे.

हे वाचा-मानधन वाढवण्यावर कार्तिक आर्यन स्पष्टच बोलला, सगळ्यांनाच…

विजय देवरकोंडा आणि अनन्या मुंबईसह इतर शहरात जोरदार प्रमोशन करत आहेत. नवी मुंबईतील एका मॉलमध्ये विजय आणि अनन्या पोहोचल्यावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली. मुलींमध्ये विजयची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे विजयला पाहून त्याचे चाहते मोठमोठ्याने ओरडू लागले आणि त्याच्या नावाच्या जल्लोष सुरू झाला. मात्र यानंतर त्या गर्दीत असणाऱ्या एका मुलीला चक्कर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.


याठिकाणी अनन्या आणि विजय त्यांच्या प्रमोशनसाठी एक विशेष उपक्रम करण्यासाठी सहभागी होणार होते. याठिकाणी चाहतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र दोघांनाही त्यांचे टास्क पूर्ण करता आले नाही. याचं कारण म्हणजे मॉलच्या मध्यभागी असलेल्या मंचावर विजय देवरकोंडा दिसल्या क्षणी चाहत्यांमध्ये गोंधळ सुरू झाला. त्याच्यासाठी वेड्या असणाऱ्या अनेकांनी ओरडण्यास सुरुवात केली.

हे वाचा-साऊथचा साधेपणा ठरतोय बॉलिवूडपेक्षा वरचढ, धनुष-विजयने जिकली चाहत्यांची मनं

मॉलमधील एका सूत्राने ETimes शी बोलताना असा खुलासा केला की, ‘ज्याक्षणी विजय स्टेजवर आला, त्या क्षणी सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. काही महिला चाहत्या बेशुद्ध पडल्याचे आणि काहीजणींनी रडायला सुरुवात केल्याचे पाहून आयोजक आणि त्याठिकाणी असणाऱ्या व्हॉलेंटिअर्सना देखील धक्का बसला. चाहत्यांच्या हातात विजयची पोस्टर्स आणि स्केचेस होती, काही जण ओरडत होते की विजय आमचे तुझ्यावर प्रेम आहे.’

हे वाचा-मराठीमध्ये लोकप्रिय होतेय ही अमराठी अभिनेत्री; युट्यूबनंतर आता गाजवतेय मालिका

इथपर्यंत सर्व ठीक होते, पण त्यानंतर चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी सुरू झाली. विजय-अनन्याच्या जवळ पोहोचण्यासाठी चाहत्यांनी बॅरिकेड्स देखील ढकलण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनन्या आणि विजयला मध्यातच हा कार्यक्रम सोडून जावा लागला.


काही दिवसांपूर्वीच लायगरचा ट्रेलर लाँंच झाला आहे. या सर्व प्रमोशनदरम्यान विजयचा साधा अंदाजही चाहत्यांचं मन जिंकून घेत आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी तो अगदी साध्या कपड्यात पोहोचला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी लायगरच्या प्रमोशनसाठी त्याने एक न्यूड फोटो असणारी पोस्टही केली होती. त्यावेळीही त्याच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या होत्या. एकंदरित विजय केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात चाहते कमावण्यात यशस्वी होताना दिसतोय.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.