नवी दिल्लीः केंद्र सरकारने आज अग्निपथ भरती (Agneepath Scheme) योजनेची घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही घोषणा जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गंत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. तसंच, तरुणांना रोजगारही दिला जाणार आहे. (Agneepath Military Recruitment)

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलाचे प्रमुखांसह या योजनेचा आज घोषणा केली आहे. भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गंत एक निर्णय घेतला आहे. आज अग्नपथाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक योजनेची घोषणा आम्ही करत आहोत. अग्निपथ योजनेअंतर्गंत अग्निवीर सेनामध्ये सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ही योजना देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी व देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने सुरू करण्यात येत आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

वाचाः १० लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा आताच का? जाणून घ्या मोदींच्या घोषणेमागचा राजकीय अर्थ

अग्निवीर जवानांसाठी ऑफर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ योजनेमुळं तरुणांचे आरोग्य आणि फिटनेस सुधारेल. तसंच, विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे एकूण जीडीपी च्या वाढीस मदत होईल. एक उत्तम पॅकेज, सेवा निधी पॅकेज, अपंगत्व पॅकेजही जाहीर केले आहे.

करोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून लष्करातील भरती प्रक्रिया रखडल्या होत्या. त्यामुळं केंद्र सरकारने ही योजना लाँच केली आहे. भारतीय हवाई दल, नेव्ही, भूदल या तिन्ही दलामध्ये चार वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाईल. या सैनिकांना अग्निवीर असं म्हटलं जाईल. या योजनेसाठी वयोमर्यादा आखून दिली आहे. २१ वर्षांपर्यंतच तरुण या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

वाचाः मोठ्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले; अन् गाढवं पाळली, पहिलीच ऑर्डर मिळाली १७ लाखांची

अग्निवीराच्या भरतीसाठी पूर्ण देशात ही योजना राबवली जाईल. मेरिटमध्ये येणाऱ्या युवकांना यातून निवडले जाईल. निवडलेल्या युवक म्हणजेच अग्निवीर ४ वर्षांपर्यंत सेवा देतील. चार वर्षांनंतर त्यांना सेनेची नोकरी सोडावी लागेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.