चंद्रपूर: चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. नव्याने सौंदर्यीकरण झालेल्या बागेतील पार्किंगमध्ये झालेल्या लाथा-बुक्क्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या मुलींनी एका मैत्रिणीला जाब विचारण्याच्या उद्देशाने पार्किंगमध्ये बोलावले. पण, व्हिडिओत बोलणं कमी आणि हाणामारी अधिक झालेलं दिसून येत आहे.

नेमकं काय घडलं?

चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची फ्रीस्टाईल हाणामारी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नव्याने सौंदर्यीकरण झालेल्या या आझाद बागेतील पार्किंगमध्ये झालेल्या लाथा-बुक्क्यांच्या भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. अगदी कमी वयातील या मुलींनी एका मैत्रिणीला जाब विचारण्याच्या उद्देशाने पार्किंगमध्ये बोलावले. मात्र, यादरम्यान त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण एका शुभम नाव्याच्या मुलावरुन झाल्याचं व्हिडिओतील संभाषणावरुन कळतं. या व्हिडीओत बोलणं कमी आणि हाणामारी अधिक झाल्याचं दिसत आहे.

हेही वाचा –धक्कादायक! ओव्हरटेकिंगवरून वाद; कावड यात्रेकरूंची जवानाला बेदम मारहाण; अर्ध्या तासात मृत्यू

‘शुभम’ या नावाच्या मुलावरुन दोन मुलींमध्ये हे भांडण झालं आहे. दोन मुली शुभम या मुलावरुन भांडत आहे. यात सुरुवातीला एकीने दुसरीचे केस पकडले आहेत आणि तिला ‘शुभमला रात्री का भेटायला गेली’ याचा जाब विचारत आहे. तर दुसरी मुलगी सांगतेय की ‘तू पण भेटायला गेली होती. माझं आणि शुभमचं काही नाही. जर तुमचं काही होतं तर मला आधी सांगायचं होतं. मी त्याला फोन करत नाही’. तेव्हा पहिली मुलगी म्हणते ‘मी तर गेली होती शुभमला भेटायला, तू काय करणार?’

यानंतर पहिली मुलगी तिथल्या इतर मुलींमधल्या तनवी नावाच्या मुलीला म्हणते की ‘तू इथेच थांब… तुला म्हटलं होतं मी की ही भेटायला गेली की मला कॉल कर. तू केला नाही, आता तू पण मार खाणार… नाहीतर मी तुझ्या घरी येऊन तमाशे करेन’

हेही वाचा –जालन्यात ‘गँगवॉर’, काठ्या,कुदळ, लोखंडी सळ्यांनी हाणामारी; पोलिसांकडून हवेत फायरिंग

त्यानंतर तिघी जणी मिळून त्या दुसऱ्या पोरीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतात. तिचे केस ओढतात. तर, तिच्या मैत्रिणी तिला सोडा, तिचे केस सोडा, अशी विनवणी करताना ऐकू येतात. काही रडतानाही ऐकू येत आहेत.

आझाद बागेत भरदिवसा हा सर्व प्रकार घडला. यावेळी आसपास अनेक तरुण-तरुणी दिसत आहेत. पण, कोणीही हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. सध्या मुलींच्या या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

हेही वाचा –Video: मुख्याध्यापक आणि शिक्षिकेत जोरदार हाणामारी, वर्ग सुरु असताना चपलेनं एकमेकांना मारलं

पाहा व्हिडिओ –

‘शुभम’वरून तरुणी भिडल्या, व्हिडिओ व्हायरलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.