उदयपूर: पंजाब, गोवा, उत्तराखंड येथील निवडणुकांत काँग्रेसला मिळालेले अपयश आणि आगामी काळात पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अखिल भारतीय काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर उदयपूर येथे सुरू झाले आहे. या शिबिरात काँग्रेस महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा केली असून काही प्रस्ताव आज मांडण्यात येणार आहे. निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून एकाच घरातील सदस्याला तिकीट मिळणार आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. (congress chintan shivir)

उद्यपूरमध्ये आजपासून तीन दिवस काँग्रेसचे चिंतन शिबीर आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिरात राहुल आणि प्रियांका वाड्रा यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे ४३० प्रमुख नेते भाग घेणार असून ते राजकारण, अर्थव्यवस्था, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, पक्ष संघटना, शेतकरी आणि कृषीक्षेत्र तसेच तरुणांशी संबंधित विषयांवर सहा वेगवेगळ्या गटांमध्ये चर्चा करणार आहेत.

वाचाः दोनदा पंतप्रधान झालात आता पुढे काय?; नरेंद्र मोदींनी दिलं भन्नाट उत्तर

आज सकाळीच सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका वाड्रा उद्यपूरमध्यो पोहोचल्या असून महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही पोहोचले आहेत. यावेळी काँग्रेसने एक महत्त्वाचा निर्णयावर चर्चा केली असून एक महत्त्वकांक्षी प्रस्ताव सादर करणार आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका परिवारातील एकाच सदस्याला निवडणुकीचे तिकीट मिळणार आहे. तसंच, पक्षाने घेतलेल्या या निर्णयावर सगळ्यांचे एकमतही झाले आहे, असं माकन यांनी म्हटलं आहे.

जर नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यास त्यांना पक्षासाठी पाच वर्ष काम करणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतरच पक्ष त्या सदस्यांचा विचार करेल, असंही माकन यांनी नमूद केलं आहे. पाच वर्षांपासून एकाच पदावर असलेल्या व्यक्तीला पायउतार व्हावे लागेल. तसंच, त्या व्यक्तीला पुन्हा त्याच पदावर येण्यासाठी किमान ३ वर्षांपर्यंत थांबावे लागेल. ५ वर्षांहून अधिक काळ कोणतीही व्यक्ती एकाच पदावर नसावी असा विचार पक्षानं मांडला आहे, असंही अजय माकन यांनी म्हटलं आहे.

वाचाः काँग्रेसचे आजपासून चिंतन शिबीर; राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होणार?

५० वर्षांखालील कार्यकर्त्यांना पदाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात येईल. तसंच, युवक काँग्रेसमध्ये ३५ वर्षांहून कमी वय असलेले तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळं पक्षात ५० वर्षाहून कमी वय असलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या ५० टक्के होईल.

वाचाः भारताची ताकद आणखी वाढणार; चीन, पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या ब्रह्मोसची यशस्वी चाचणीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.